प्रियांका चोप्राच्या वहिनीला हळदीमुळे झाली रिअ‍ॅक्शन; जाणून घ्या हळदीचा वापर योग्यरित्या कसा करावा?

Turmeric Reaction Priyanka Chopra's Sister in Law : प्रियांका चोप्राच्या वहिणीला हळदीमुळे झाली रिअ‍ॅक्शन, जाणून घ्या कशी घ्यावी काळजी?

दिक्षा पाटील | Updated: Feb 13, 2025, 04:33 PM IST
प्रियांका चोप्राच्या वहिनीला हळदीमुळे झाली रिअ‍ॅक्शन; जाणून घ्या हळदीचा वापर योग्यरित्या कसा करावा? title=
(Photo Credit : Social Media)

Turmeric Reaction Priyanka Chopra's Sister in Law : बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राचा भाऊ सिद्धार्थ चोप्रानं नीलम उपाध्यायसोबत 7 फेब्रुवारी रोजी सप्तपदी घेतल्या. त्यांच्या लग्नातील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. इतकंच नाही तर लग्नातील आणि लग्नानंतरचे नीलमचे फोटो देखील चर्चेचा विषय ठरत आहेत. नुकताच नीलमनं सोशल मीडियावर तिचा एक फोटो शेअर केला आहे. त्यात तिच्या त्वचेला झालेल्या रिअ‍ॅक्शन विषयी तिनं सांगितलं. तिला ही रिअ‍ॅक्शन हळदीमुळे झाल्याचे म्हटले आहे. त्यामुळे अशा वेळी हळदीचा वापर कसा करायचा जेणे करून तुम्हाला काही रिअ‍ॅक्शन होणार नाही याविषयी जाणून घेऊया...

नीलमनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिच्या कॉलरबोनचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत तिच्या मानेवर आणि खांद्यावर रिअ‍ॅक्शन झाल्याचे दिसत आहे. हा फोटो शेअर करत नीलमनं लिहिलं की हे काय आहे? मला वाटतं की सुर्यप्रकाशमुळे झालेली ही हळदीची रिअ‍ॅक्शन आहे. महत्त्वाचं म्हणजे कार्यक्रमा आधीच मी पॅच टेस्ट केली होती आणि सगळं ठीक होतं. 

हळदीचे फायदे

हळदीचे तुमच्या त्वचेला खूप जास्त फायदे आहेत. हळदीत कर्क्यूमिन असते ज्यामुळे दाहकता कमी होते आणि त्यात असलेल्या अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात. त्यामुळे हळज तुमच्या त्वचेला रिव्हाइव्ह करण्यास मदत करतात. त्याशिवाय त्यामुळे त्वचेला एक नॅच्युरल ग्लो येतो. दरम्यान, हळदीचा वापर करण्या आधी काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. त्या खालील प्रमाणे आहे. 

जास्त प्रमाणात हळदीचा वापर टाळा

हळद तुमच्या त्वचेचं आरोग्य सुधारू शकतं. पण हीच हळद काळजीपूर्वक वापरणं हे गरजेचं आहे. जास्त प्रमाणात हळदीचा वापर केल्यास त्याची रिअ‍ॅक्शन होण्याची शक्यता आहे. 

हळदीची शुद्धता

प्रत्येक हळदीची पावडर ही तितकीच शुद्ध असेल याची शाश्वती नाही. स्वस्त आणि भेसळयुक्त हळदीचा तुमच्या त्वचेवर परिणाम होऊ शकतो. 

अ‍ॅलर्जी आहे की नाही ते तपासा

काही लोकांना हळदीची अ‍ॅलर्जी असते त्यामुळे आधीच चाचणी करा कारण त्यानंतर खाज येऊ शकते किंवा सूज येऊ शकते. 

(Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)