लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये आहात? मग अशा प्रकारे साजरा करा व्हँलेंटाइन डे

14 फेब्रुवारीला जोडप्यांसाठी खास असणारा 'व्हँलेंटाइन डे' साजरा केला जाणार आहे. मात्र, लॉंग डिस्टन्समध्ये असणाऱ्या जोडप्यांसाठी हा दिवस साजरा करणे अवघड होते. पण, लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये असणाऱ्यांसाठी व्हँलेंटाइन डे साजरा करण्यासाठी आम्ही काही प्लॅन सांगणार आहोत.   

Updated: Feb 13, 2025, 04:17 PM IST
लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये आहात? मग अशा प्रकारे साजरा करा व्हँलेंटाइन डे  title=

Long Distance Valentine: येत्या 14 फेब्रुवारीला जोडप्यांसाठी खास असणारा 'व्हँलेंटाइन डे' साजरा केला जाणार आहे. कपल्ससाठी हा दिवस खूपच आनंदाचा असून या दिवशी प्रेयसी आणि प्रियकर एकमेकांसाठीचे प्रेम व्यक्त करतात. या दिवशी कपल्स डेटवर जातात आणि एकमेकांसोबत छान वेळ घालवतात. 7 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या प्रेमाच्या आठवड्याचा 'व्हँलेंटाइन डे' हा शेवटचा दिवस असतो. 

जोडप्यांसाठी स्पेशल असलेला 'व्हँलेंटाइन डे' हा लॉंग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये असणाऱ्यांना मात्र, हवा तसा साजरा करता येत नाही. एकमेकांपासून लांब असल्या कारणाने या दिवशी कप्लस एकमेकांना भेटू शकत नाहीत आणि एकत्र वेळ घालवण्यासाठी सेलिब्रेशनचा प्लॅनदेखील करणे अवघड होते. पण, लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये असणाऱ्यांसाठी व्हँलेंटाइन डे साजरा करण्यासाठी आम्ही काही प्लॅन सांगणार आहोत. 

व्हर्च्यूअल डेट

व्हँलेंटाइन डेला आपल्या साथीदारासोबत व्हिडीओ कॉलवर व्हर्च्यूअल डेट हा उत्तम पर्याय ठरु शकतो. यादरम्यान आपल्या साथीदारासाठी प्रेम व्यक्त करत, मजा-मस्करी करत तुम्ही एकमेकांशी गप्पा मारु शकता. व्हिडीओ कॉलवर एकमेकांकडे बघत प्रेमाच्या गप्पा मारल्यामुळे तुम्हाला एकमेकांच्या जवळ नसल्याची खंत जाणवणार नाही. 

सरप्राइज गिफ्ट प्लॅन करा

लॉंग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये असणारे कपल्स आपल्या साथीदारासाठी सरप्राइज गिफ्ट प्लॅन करु शकतात. तुम्ही तुमच्या साथीदाराला एखादं गिफ्ट पाठवून प्रेम व्यक्त करु शकता. सध्याच्या काळात ऑनलाइन आवडती वस्तू खरेदी करुन तुम्ही सोप्यारितीने आपल्या साथीदाराला गिफ्ट पाठवू शकता. ऑनलाइनवर सुद्धा गिफ्टसाठी बरेच पर्याय उपलब्ध असतात.

ऑनलाइन गेम्स खेळू शकता

लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये मनोरंजनाचे क्षणसुद्धा खूप गरजेचे असतात. तुम्ही ऑनलाइन आपल्या साथीदारासोबत क्विझ किंवा गेम्स खेळू शकता. ऑनलाइन असे बरेच एप्स आणि वेबसाइट्स असतात, ज्यावरुन तुम्ही एकमेकांपासून दूर असलात तरी एकमेकांसोबत गेम्स खेळू शकता. अशाप्रकारे तुम्ही तुमच्या साथीदारासोबत चांगला वेळ घालवू शकाल.

हे ही वाचा: Valentines Day 2025 Wishes : आयुष्यभर प्रेमाचा... व्हॅलेंटाईन डेच्या हार्दिक शुभेच्छा; जवळच्या व्यक्तीला पाठवा खास मराठी मॅसेज

 

 

व्हर्च्यूअल डिनर 

जर तुम्ही तुमच्या साथीदारापासून दूर आहात तर तुम्ही नक्कीच व्हर्च्यूअल डिनर करु शकता. दोघे आपापल्या घरी आवडीचे खाद्यपदार्थ बनवून एकत्र व्हिडीओ कॉलवर डिनर करु शकता. यावेळी तुम्ही एकमेकांशी गप्पा मारत व्हेलेंटाइन डे साजरा करु शकाल आणि एकमेकांसोबत छान वेळ घालवू शकाल.