Mystery of this Indian Famous Temple : रहस्य... पृथ्वीवर कैक अशी रहस्य आहेत ज्यांचा उलगडा आजपर्यंत झालेला नाही. काही रहस्य तर अशी आहेत जिथं खुद्द संशोधक आणि अभ्यासकांनीसुद्धा प्रचंड मेहनत घेतली. पण, त्यांच्या हाती निशाराच लागली. दक्षिण भारतातही एक असंच मंदिर आहे, ज्याभोवती अनेक रहस्यांचं वलय असून, काही रहस्यांमागची मुख्य कारणं अद्यापही समोर आलेली नाहीत.
हे आहे केरळातील शबरीमाला मंदिर. दक्षिण भारतातील केरळ राज्यात असणारं शबरीमाला मंदिर प्रचंड रहस्यमयी असून, तिथं भगवान अय्यप्पा यांची आराधना केली जाते. कोणालाही सहजासहजी भगवान अय्यप्पा यांचं दर्शन घेता येत नाही. इथं पोहोचण्यासाठी 41 दिवसांचं कठोर ब्रह्मचर्य आणि त्यानंतर सात्विक भोजन अशा नियमांचं पालन करावं लागतं.
चारही बाजूंनी या मंदिराला डोंगररांगांचा वेढा असून, मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी 8 पवित्र पायऱ्या चढून यावं लागतं. या प्रत्येक पायरीचा एक वेगळा अर्थ आहे.
पहिल्या पाच पायऱ्या मानवाच्या पंचेंद्रियांचं प्रतीक आहेत. यानंतरच्या 8 पायऱ्या मानवी भावनांशी संलग्न असल्याचं म्हटलं जातं. तर, उर्वरित तीन पायऱ्या मानवी गुण आणि त्यानंतरच्या दोन पायऱ्या ज्ञान, अज्ञानाचं प्रतीक आहेत.
शबरीमाला मंदिर हे तिथं असणाऱ्या काही चमत्कारिक गोष्टींसाठीही ओळखलं जातं. असं म्हणतात की, मकर संक्रांतीच्या काळोख्या राच्री इथं अनेकदा डोंगररांगांमध्ये वेळोवेळी एक पेटती ज्योत पाहायला मिळते. हीच ज्योत पाहण्यासाठी जगभरातून भाविक येतात, इथं येणाऱ्यांची अशी धारणा आहे की या ज्योतीच्या रुपात खुद्द भगवान अय्यप्पा भक्तांना दर्शन देतात. काहींच्या मते जेव्हा ही ज्योत दिसते तेव्हा एक आवाजही ऐकू येतो. अशा या मंदिरात येताना पुरुष मंडळी अनेकदा काळी वस्त्र परिधान करतात. प्रचंड खडतर प्रवास करून भाविक इथवर पोहोचतात आणि येथील वातावरण पाहून भारावून जातात.