'या' सुपरस्टारने अभिषेक आणि ऐश्वर्याच्या लग्नाची मिठाई केली होती परत, नेमकं काय कारण?

बॉलिवूडमधील या सुपरस्टारने अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या लग्नाची मिठाई घरी येताच परत पाठवली होती. 

सोनेश्वर पाटील | Updated: Feb 13, 2025, 04:02 PM IST
'या' सुपरस्टारने अभिषेक आणि ऐश्वर्याच्या लग्नाची मिठाई केली होती परत, नेमकं काय कारण?  title=

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय हे दोघेही गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहेत. अनेक दिवसांपासून दोघांच्या घटस्फोटाच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत होत्या. परंतु दोघांनीही अशा कोणत्याही बातमीची पुष्टी केली नाही आणि नंतर ते एका कार्यक्रमात एकत्र दिसले. जेव्हा एका कार्यक्रमादरम्यान ऐश्वर्या-अभिषेक एकत्र दिसले तेव्हा या अफवांना पूर्णविराम मिळाला. एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अभिषेक आणि ऐश्वर्या प्रेमात पडले आणि नंतर त्यांनी लग्न केले. 

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांचे लग्न एका खाजगी समारंभात झाले होते. त्यांच्या लग्नाला फक्त काहीच लोकांना आमंत्रित करण्यात आले होते. पण जेव्हा अमिताभ बच्चन यांनी त्यांचे मित्र शत्रुघन सिन्हा यांना आमंत्रित केले नाही तेव्हा त्यांना राग आला होता.त्यानंतर जेव्हा अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या यांच्या लग्नाची मिठाई त्यांच्या घरी पाठवण्यात आली होती, तेव्हा शत्रुघन सिन्हा यांनी ती परत पाठवली होती.

शत्रुघ्न सिन्हा यांनी उघडपणे व्यक्त केली होती नाराजी

शत्रुघ्न सिन्हा यांनी त्यांची नाराजी उघडपणे व्यक्त केली होती. मिड डेला दिलेल्या मुलाखतीत शत्रुघ्न सिन्हा यांना याबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्यांनी सांगितले की, अमिताभ बच्चन म्हणाले होते की लग्नाला आमंत्रित न केलेले लोक मित्र नव्हते. मग जेव्हा लग्नाला बोलावलं नाही तर मिठाई कशासाठी? आणि मी मिठाई स्वीकारून त्यांना लाजवणार नाही. किमान मला तरी अशी अपेक्षा होती की मिठाई पाठवण्यापूर्वी अमिताभ किंवा त्याच्या कुटुंबातील कोणीतरी एकदा फोन करेल. पण तेव्हा कोणीही ते केले नाही. तेव्हा मिठाईचा काय अर्थ आहे? त्यामुळे शत्रुघ्न सिन्हा यांना राग आला होता. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

अभिषेक-ऐश्वर्याच्या लग्नाला कमी लोकांना का आमंत्रित केले होते? 

'कॉफी विथ करण'मध्ये जेव्हा अभिषेक बच्चन आला होता,तेव्हा त्याला देखील हा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर अभिषेक म्हणाला होता की, लग्नाच्या वेळी त्याची आजी तेजी बच्चन आजारी होती आणि तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. म्हणूनच कमी लोकांना लग्नात बोलावण्यात आले होते. जरी नंतर मिठाई सर्वांच्या घरी पोहोचवून त्यांचे आशीर्वाद घेतले गेले, परंतु शत्रुघ्न काकांनी मिठाई परत केली. आम्ही तेव्हा ते स्वीकारले कारण तुम्ही सर्वांना खूश करू शकत नाही. कारण ते खूप चांगले व्यक्ती आहेत. त्यांना आपले विचार व्यक्त करण्याचा पूर्ण अधिकार आहे असं अभिषेक म्हणाला होता.