ISPL च्या फायनलमध्ये अक्षय कुमारच्या लेकीनं वेधलं सगळ्यांचं लक्ष, VIDEO पाहताच लोकांना आली ट्विंकलची आठवण

Akshay Kumar Daughter Nitara : अक्षय कुमारची लेक निताराच्या व्हिडीओनं वेधलं सगळ्यांचं लक्ष...

दिक्षा पाटील | Updated: Feb 16, 2025, 08:53 AM IST
ISPL च्या फायनलमध्ये अक्षय कुमारच्या लेकीनं वेधलं सगळ्यांचं लक्ष, VIDEO पाहताच लोकांना आली ट्विंकलची आठवण title=
(Photo Credit : Social Media)

Akshay Kumar Daughter Nitara : ठाण्यात काल 15 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग म्हणजेच ISPL ची फायनल मॅच झाली. या निमित्तानं अमिताभ बच्चन देखील तिथे दिसले. त्यावेळी सगळ्यांचं लक्ष कोणी वेधलं असेल तर ती म्हणजे अक्षय कुमारची लेक नितारानं. निताराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या आधी निताराचे अनेक व्हिडीओ व्हायरल झालेत पण त्यावेळी तिचा चेहरा कॅमेऱ्यात नीट कैद झाला नाही. पण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या क्लिपमध्ये स्पष्ट दिसून येत आहे की ती आई ट्विंकल खन्ना सारखी दिसते. 

विरल भयानी या सेलिब्रिटी फोटोग्राफरनं निताराचा हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. यात सुरुवातीला निताराचा चेहरा स्पष्ट दिसत नाही आहे. तर आता अक्षय कुमारच्या लेकीचा संपूर्ण चेहरा दिसला आहे. नेहमीच आईसोबत दिसणारी नितारा यावेळी वडील अक्षय कुमारसोबत ISPL मॅच पाहताना स्पॉट झाली. एका व्हिडीओमध्ये ती अक्षयशी बोलताना दिसली. तर दुसऱ्यामध्ये या सामन्याला घेऊन असलेला तिचा उत्साह पाहायला मिळाला. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

व्हिडीओत दिसून येत आहे की अक्षय निताराकडे संपूर्ण लक्ष देतोय. निताराचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी म्हटलं आहे की ती अगदी आई ट्विंकलसारखी दिसते. संपूर्ण कमेंट सेक्शनमध्ये हेच बोलताना दिसत आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणासा, 'मुलगी अगदी आईवर गेलीय.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'ही तर तिची आई ट्विंकल खन्नाची फोटोकॉपी आहे. तिसरा नेटकरी म्हणाला, देवा अगदी ट्विंकल खन्ना.' आणखी एक नेटकरी म्हणाला, टती ट्विंकल खन्ना आणि अक्षय कुमारची मॅशअप आहे.' अनेकांनी कमेंट करत अक्षय कुमारला सगळ्यात चांगला वडील म्हटलं आहे. 

हेही वाचा : 'माझ्या आई-वडिलांना तर...', मुस्लिम क्रिकेटपटूशी लग्न करण्यावर प्रसिद्ध अभिनेत्रीनं सोडलं मौन

नितारा या नावाचा काय अर्थ आहे असा अनेकांना प्रश्न पडलेला असतो. तर नितारा हा एक संस्कृत शब्द आहे. त्याचा अर्थ असा आहे की जमिनीशी जोडलेली असणं. दरम्यान, अक्षय कुमारविषयी बोलायचं झालं तर तो नुकताच 'स्काय फोर्स' या चित्रपटात दिसला आहे.