Kareena Kapoor Khan : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर आणि सैफ अली खान हे असे सेलिब्रिटी आहेत ज्यांनी कधीच त्यांच्या मुलांना पापाराझींपासून लपवलं नाही. पण आता काही तरी वेगळंच चित्र पाहायला मिळत आहे. करीनानं चक्क पापाराझींना तिच्या मुलांचे फोटो काढू नका असं म्हटलं आहे. असं बोलतानाचा करीनाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात ती पापाराझींना स्पष्ट सांगताना दिसते की मुलांचे फोटो काढू नका.
करीनाचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं शेअर केला आहे. करीनाचा हा व्हिडीओ मुंबईतीलच आहे. करीना ही तिचे वडील रणधीर कपूर यांचा 78 वा वाढदिवस साजरा करण्यासाठी ठेवण्यात आलेल्या पार्टीत पोहोचली होती. त्यावेळी करीना पापाराझींना म्हणाली, माझे फोटो घेऊन तुम्ही कृपया इथून जा. मुलांबद्दल तुम्हाला सांगितलं होतं ना. करीनाचं वक्तव्य ऐकताच तिला होकारआर्थी उत्तर देत पापाराझीनी मुलांचे फोटो काढले नाही. दरम्यान, असं असलं तरी करीनाला त्यांच्यावर विश्वास नव्हता. त्यामुळे ती सतत हेच बोलताना दिसली.
दरम्यान, असं म्हटलं जातं की गेल्या महिन्यात सैफ आणि करीनानं वक्तव्य करत सुरक्षेच्या चिंते खातर पापाराझी आणि मीडिया आउटलेट्सना त्यांच्या मुलांचे फोटो काढू नका असं म्हटलं. याशिवाय त्यांच्या घराच्या आजुबाजूला घोळका करुन राहू नका हे देखील सांगितलं. त्याचं कारण म्हणजे गेल्या महिन्यात 16 जानेवारी रोजी त्यांच्या अपार्टमेंटमध्ये एक अनोळखी व्यक्ती घुसली आणि चोरीच्या प्रयत्नात आलेल्या चोरानं सैफवर हल्ला केला. या सगळ्या गोंधळात सैफवर 6 वेळा चाकूनं वार झाले. त्याच्यानंतर त्याला लगेच लीलावती रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं.
हेही वाचा : ISPL च्या फायनलमध्ये अक्षय कुमारच्या लेकीनं वेधलं सगळ्यांचं लक्ष, VIDEO पाहताच लोकांना आली ट्विंकलची आठवण
या सगळ्यात सैफ विषयी बोलायचं झालं तर तो पूर्णपणे ठीक झालेला आहे. तो आता कामावर परतला आहे. त्याचा मुंबईत एक डबिंग स्टुडियो आहे. तिथे आल्यानंतर तो मीडियासाठी हसताना दिसत आहेत. दरम्यान, सैफच्या आगामी चित्रपट ‘ज्वेल थीफ’ आहे. जे नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. काही दिवसांपूर्वी तो नेटफ्लिक्सच्या आगामी प्रोजेक्ट्सच्या घोषणा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाला होता.