Optical Illusion Trending : ऑप्टिकल इल्युजन चित्रे दररोज इंटरनेटवर (Internet) व्हायरल (Optical Illusion Viral Pictures) होतात. ऑप्टिकल इल्युजन (Optical Illusion) फोटो म्हणजे डोळ्यांना फसवणारी चित्रे. ऑप्टिकल इल्युजन फोटो पाहिल्यानंतर बहुतेक लोक गोंधळून जातात. कारण या फोटोमध्ये दडलेल्या वस्तू शोधण्यात वेगळीच मजा असते. प्रवासात किंवा फावल्या वेळेत तेवढाच टाईमपास (Timepass) होतो. कोड्यामुळे डोळे आणि बुद्धीचा कस लागतो. असाच एक ऑप्टिकल भ्रम लोकांना गोंधळात टाकत आहे आणि लोक योग्य उत्तर शोधण्यात अपयशी ठरत आहेत. हे कोडं सोडवण्यासाठी फक्त 10 सेकंदाचा अवधी आहे. (Optical Illusion Find the hot chocolate cup in this photo you only have 10 seconds nz)
आज आम्ही तुमच्यासाठी अशीच ऑप्टिकल इल्युजन टेस्ट घेऊन आलो आहोत, ज्यामध्ये अनेक पेंग्विनमध्ये एक हॉट चॉकलेट कप (Hot chocolate cup) लपलेला आहे. गंमत म्हणजे लाखो प्रयत्न करूनही हॉट चॉकलेटने भरलेला कप लोकांना दिसत नाही. जर तुमचे डोळे गरुडासारखे तीक्ष्ण असतील तर तुम्हाला ते क्षणार्धात सापडेल. तो हॉट चॉकलेट कप शोधण्यासाठी तुमच्याकडे फक्त 10 सेकंद आहेत.
तुम्ही या चित्रात पाहू शकता की एका ठिकाणी पेंग्विन जमले आहेत, जिथे ते हिवाळ्याची सुरुवात साजरी करत आहेत. काही पेंग्विन स्नोमेन बनविण्यात व्यस्त आहेत, तर काही मासेमारी करत आहेत. याशिवाय काही पेंग्विन वेगवेगळ्या रंगांच्या टोप्यांमध्येही दाखवण्यात आले आहेत. तिथे एकाने मफलर घातला आहे. या पेंग्विनमध्ये हॉट चॉकलेटचा एक मग लपला आहे. जर तुम्हाला अजूनही या चित्रात हॉट चॉकलेट कप शोधता आला नसेल तर उजवीकडच्या स्केचकडे बघून खाली आल्यावर मफलर घातलेल्या पेंग्विनच्या शेजारी तो कप दिसतो. तुम्हाला तो कप शोधता येत नसेल तर उत्तरासहित खाली एक फोटो तुम्हाला शेअर करतो.
या चित्रात हॉट चॉकलेट कप कुठे लपला आहे तुम्ही पाहिलेत का? वास्तविक हे चित्र अशा पद्धतीने बनवण्यात आले आहे की, त्यात तो हॉट चॉकलेट कप शोधणे प्रत्येकाला सोपे नाही. ही अशी कोडं आपल्या मेंदूला चालना देण्यासाठी उत्तम मानली जातात. यामुळे फावल्या वेळेत आपले मनोरंजन ही होते.