नवी दिल्ली : चार दिवसांच्या पश्चिम आशियातील देशांच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आज फिलीस्तीनला पोहोचले. फिलीस्तीनचा दौरा करणारे पंतप्रधान मोदी पहिले भारतीय पंतप्रधान आहेत.
पीएम मोदी आधी जॉर्डनची राजधानी अम्मान येथे पोहोतले होते. त्यानंतर ते फिलीस्तीनला पोहोचले. फिलीस्तीनच्या राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांनी प्रोटोकॉल तोडून पंतप्रधान मोदींचं स्वागत केलं.
Prime Minister Narendra Modi accorded ceremonial guard of honour at Al-Muqata'a, compound of the presidential headquarters in Palestine's Ramallah pic.twitter.com/AY3uZ4mwW6
— ANI (@ANI) February 10, 2018
रामल्लाहमध्ये पीएम मोदींनी सर्वात आधी दिवंगत फिलीस्तीनी नेता यासिर अराफात यांच्या समाधीवर जाऊन श्रद्धांजली वाहिली. या दरम्यान मोदीसोबत राष्ट्राध्यक्ष महमूद देखील उपस्थित होते.
पीएम मोदी यानंतर फिलीस्तीनच्या राष्ट्रपती भवनात पोहोचले तेथे महमूद अब्बास यांनी त्यांचं औपचारिक स्वागत केलं. राष्ट्रपती भवनमध्ये पीएम मोदींना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आलं.