मुंबई : जर तुम्ही 20 रुपये किलोचे बटाटे घेता तेव्हा देखील वजन काटा बरोबर आहे ना याची खात्री करुन घेतात. पण एका व्यापाऱ्याने एक बटाटा तब्बल 7 कोटींना खरेदी केला आहे. ही बातमी वाचून तुम्हाला पण धक्का बसला असेल पण ही गोष्ट खरी आहे. हा एक बटाटा खरेदी करणारा एक यूरोपचा व्यापारी आहे. या व्यक्तीने जो बटाटा खरेदी केला आहे ती एक पेंटींग आहे. 7 कोटींची ही पेंटींग आहे. पण तुम्हाला प्रश्न पडला असेल की एका बटाट्याची पेंटींग 7 कोटींना का घेतली असेल.
हा फोटो 2010 मध्ये प्रसिद्ध आयरिश फोटोग्राफर लेन्समॅन केविन अबॉशने काढला होता. यानंतर केविन अबॉशने या फोटोची पेंटींग तयार केली. केविनची ही पेंटिंग 1.5 लाख डॉलरला विकली गेली. केविनला ब्लॅक ड्रॉप पोट्रेट फोटोग्राफीसाठी देखील जाणलं जातं. केविनला बटाटा खूप आवडतो. बटाट्याची ही पेंटींग काढण्यासाठी त्याने अनेक फोटो काढले होते. ज्यामध्ये या फोटोची पेटींग तयार करण्यात आली. एक प्रसिद्ध फोटोग्राफरच्या फोटो पेक्षा त्याची पेंटींग अधिक महाग आहे. ही पेंटींग जेव्हा यूरोपच्या एका बिझनेसमॅनने पाहिली तेव्हा या पेंटींगच्या ते प्रेमात पडले आणि 7 कोटी देऊन त्यांनी ही पेंटींग खरेदी केली.