याला म्हणतात प्रामाणिकपणा, रस्त्यावर सापडलेले 38 लाख केले माघारी, पंतप्रधानांनी त्याला...

कौतुकास्पद! 38 लाख रुपयांच्या नोटांनी भरलेली बॅग सापडली त्यानंतर मुलाने...

यशवंत साळवे | Updated: Dec 4, 2022, 04:10 PM IST
याला म्हणतात प्रामाणिकपणा, रस्त्यावर सापडलेले 38 लाख केले माघारी, पंतप्रधानांनी त्याला...  title=

 Viral News : वाढत्या गरजांच्या या युगात आफ्रिकन देशातील हा मुलगा लोकांमधील प्रामाणिकपणा कमी होत असताना प्रामाणिकपणाचे उदाहरण बनला आहे. आर्थिक चणचण असतानाही या मुलाने रस्त्याच्या कडेला सापडलेले 38 लाख रुपये त्याच्या मालकाला सुपूर्द केले. त्या पैशातून या मुलाने एक रुपयाही घेतला नसला तरी नशिबाने त्याला त्याच्या प्रामाणिकपणाचे असे बक्षीस दिले की आज तो जगभरातील माध्यमांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.

19 वर्षीय इमॅन्युएल टुलो हा पश्चिम आफ्रिकन देश लायबेरियाचा रहिवासी आहे. मोटारसायकल टॅक्सी ड्रायव्हर म्हणून काम करणारा टुल्लो इतका कमी कमावतो की तो रोजचा खर्चही भागवू शकत नाही. अशा स्थितीत एके दिवशी त्याला रस्त्याच्या कडेला एका पिशवीच्या रूपात असा खजिना सापडला, जो त्याच्या आयुष्यातील त्रास दूर करू शकतो. प्रत्यक्षात त्याला रस्त्याच्या कडेला 38 लाख रुपयांच्या लायबेरियन आणि अमेरिकन नोटांनी भरलेली बॅग सापडली.

 टुलोला हवे असते तर या पैशाने तो त्याचे आयुष्य बदलू शकला असता, पण त्याने तसे केले नाही. ते पैसे आपल्या मावशीला दिले आणि सांगितले की जर कोणी सरकारी रेडिओवर या पैशासाठी आवाहन केले तर तो ते देईल. लोकांनी त्याच्या प्रामाणिकपणाची खूप खिल्ली उडवली. काहींनी तर तो गरिबीतच मरणार असल्याचेही सांगितले. पण लोकांच्या बोलण्याला न जुमानता टुलो आपल्या सत्याला आणि प्रामाणिकपणाला चिकटून राहिला. त्याला माहीतही नव्हते की त्याला त्याच्या प्रामाणिकपणाचे एवढे मोठे बक्षीस मिळणार आहे, ज्यामुळे तो जगभर प्रसिद्ध होईल.

टुलो यांच्या प्रामाणिकपणाची बातमी देशाचे अध्यक्ष जॉर्ज विया यांच्यापर्यंत पोहोचली. त्यानंतर त्याला 8 लाखांचे बक्षीस देण्याबरोबरच त्याला देशातील सर्वात प्रतिष्ठित शाळेत प्रवेशही मिळवून दिला. आता टुलो त्याच्यापेक्षा 6 वर्षांनी लहान मुलांसोबत शिकत आहेत. यासोबतच एका अमेरिकन कॉलेजने या प्रामाणिक मुलाला त्याच्या पदवीच्या अभ्यासासाठी पूर्ण शिष्यवृत्ती देऊ केली आहे.

राष्ट्रपतींन कडून मिळालेल्या 8 लाख रुपयांसह, इमॅन्युएलला स्थानिक मीडिया मालकाकडून रोख रक्कम देखील मिळाले जी त्यांना प्रेक्षकांनी आणि श्रोत्यांनी पाठवले होते. एवढेच नाही तर ज्या व्यक्तीचे पैसे त्याने परत केले होते, त्याच्याकडून इमॅन्युएलला एक लाख रुपयांहून अधिकचे बक्षीसही मिळाले . त्याचवेळी अमेरिकेतील एका महाविद्यालयाने त्याला माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर पूर्ण शिष्यवृत्ती देण्याची तयारी दर्शवली आहे.

इमॅन्युएल हा अनेक लायबेरियन मुलांपैकी एक आहे ज्यांना गरिबीमुळे शाळा सोडण्यास आणि नोकरी करण्यास भाग पाडलं जातं. इमॅन्युएलने वडिलांच्या मृत्यूनंतर वयाच्या 9 व्या वर्षी अभ्यास सोडला. त्यानंतर तो मावशीकडे राहत होता. कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी त्यांनी मोटारसायकल टॅक्सी चालवण्यास सुरुवात केली.

आता त्याच्या प्रामाणिकपणामुळे इमॅन्युएल पुन्हा अभ्यास करू शकतो. माध्यमिक शालेय शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्याला 6 वर्षे लागतील. आणि वयाच्या 25 व्या वर्षी तो पदवीधर होईल. इमॅन्युएलला विद्यापीठात अकाउंटिंगचा अभ्यास करायचा आहे. जेणेकरून देशाची अर्थव्यवस्था हाताळण्यात तो हातभार लावू शकेल.