Businessman who losts his wealth overnight: आपलं नशीब कधी कसं फिरेल हे आपल्याला काही सांगता येत नाही. त्यामुळे कधी यश - अपयश (How to be successful) हे काही सांगून येत नाही. कधी आपल्या पदरी भरपूर यश येतं तर कधी आपल्या आयुष्यात सडकून अपयश येतं. असंच नुकतंच काहीसं एका तरूणाच्या बाबतीत घडलं आहे. सध्या विश्व जगतात अशी एक बातमी सगळीकडे पसरते आहे जी ऐकून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. या तरूणाच्या बाबतीत अशीच एक विचित्र घटना घडली आहे. कधी शून्यापासून सुरूवात करत अब्जावधी रूपये कमावले होते परंतु 24 तासांच्या आतच त्याच्या नेटवर्थमध्ये (Networth) अचानकच घट झाली आहे. सॅम बँकमन-फ्राइड (Sam Bankman Fried) असे या तरूणाचे नाव असून तो एफटीएक्सचा सह-संस्थापक (Co-founder) आहे. एकेकाळी मार्क झुकरबर्गलाही (Mark Zuckerburg) मागे टाकणार हा तरूण आज आर्थिक अडचणीत आला आहे. तेव्हा जाणून घेऊया नक्की हे प्रकरण काय?
सॅम बँकमन-फ्राइड हा तरूण जगातला सर्वात श्रीमंत तरूण होता. एफटीएक्सचा(FTX) सॅम हा सह-संस्थापक आहे. ज्याची एकूण मालमत्ता $15.2 अब्ज होती. पण एफटीएक्स विकल्याच्या बातमीने त्याचे जगच बदलून गेले. आता त्यांची संपत्ती 94 टक्क्यांनी घटली आहे. म्हणजेच आता सॅम बँकमन-फ्राइड $991.5 दशलक्षचा मालक झाला आहे. अशा या प्रकरणामुळे सध्या त्याची नेटवर्थ फारच कमी दिसते आहे. त्याच्या FTX या कंपनीचा प्रतिस्पर्धी बियान्स (Binance) त्याचे क्रिप्टो एक्सचेंज FTX खरेदी करणार होते परंतु ते काही शक्य झाले नाहीत.
गरीब अब्जाधीश अशी उपमा मिळाली अन् :
हे सर्व क्रिप्टो एक्सचेंज एफटीएक्सच्या खरेदीच्या घोषणेनंतर सुरू झाले. सॅम बँकमन-फ्राइडला मोठा झटका बसला आहे. हा अब्जाधीश गरीब होण्याच्या मार्गावर पोहोचला आहे. कोणत्याही अब्जाधीशांच्या संपत्तीत 24 तासांत झालेली ही सर्वात मोठी घट असल्याचे सांगण्यात येत आहे. आता हे प्रकरण सोशल मीडियावर (Social Media) वेगाने व्हायरल होत आहे आणि लोकांना धक्का बसायला भाग पाडत आहे. 2017 मध्ये क्रिप्टोकरन्सीच्या (Crypto Currency) जगात येण्यापूर्वी या प्रसिद्ध अब्जाधीशाने वॉल स्ट्रीटमध्ये ब्रोकर म्हणूनही काम केले होते. मात्र एका रात्रीत त्यांचे नशीब पालटले.