Passport वर आडनाव नाहीये? तर पर्यटन दूर, देशात प्रवेश मिळणंही कठीण

Passport Single Name Decision: एका नव्या नियमामुळं सध्या सर्वत्र अशांततेचं वातावरण पाहायला मिळत आहे. सदर नियमाअंतर्गत नागरिकांना देशात प्रवेश देण्यासही निर्बंध लागले आहेत

Updated: Nov 24, 2022, 08:28 AM IST
Passport वर आडनाव नाहीये? तर पर्यटन दूर, देशात प्रवेश मिळणंही कठीण  title=
UAE Single Name Decision passengers with single name on passport will not permitted to travel read details

Passport Single Name Decision: एका नव्या नियमामुळं सध्या सर्वत्र अशांततेचं वातावरण पाहायला मिळत आहे. सदर नियमाअंतर्गत नागरिकांना देशात प्रवेश देण्यासही निर्बंध लागले आहेत, त्यामुळंच ही अशांतता. हे सर्व प्रकरण आहे, संयुक्त अरब अमिरात अर्थात UAE मधील. या देशाकडून लागू करण्यात आलेल्या नियमांअंतर्गत प्रवास नियमांमध्ये मोठे आणि तितकेच आवश्यक बदल करण्यात आले आहेत. 

नव्या नियमावलीनुसार (Rules) ज्या प्रवाशांच्या पासपोर्टवर (Passport) फक्त एकेरी नावाचाच उल्लेख आहे आणि ते पर्यटन (travel) किंवा इतर कोणत्याही कारणानं व्हिसा घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत किंवा तशी योजना आखत आहेत तर त्यांना किमान सध्या युएईमध्ये तरी प्रवास करण्यास परवानगी नाही. प्रवास करण्यासाठी सर्वप्रथम या प्रवाशांना त्यांचं पहिलं नाव आणि आडनाव स्पष्ट करावं लागणार आहे. 28 नोव्हेंबरपासून हा नियम लागू होणार आहे. अर्थात या नियमाला काही अपवादही असतील. 

वाचा : सोप्या उदाहरणानं समजून घ्या नवा नियम

अधिकृत पत्रकात काय म्हटलं आहे? 

UAE च्या वतीनं देण्यात आलेल्या अधिकृत आदेशांनुसार 21 नोव्हेंबर 2022 पासून पर्यटक प्रवास किंवा इतर कोणत्यागी प्रकारच्या व्हिसा, पासपोर्टच्या देशात येणार असतील आणि त्याच्या पासपोर्टवर फक्त पहिल्याच नावाचा उल्लेख असेल (आडनाव नमूद नसेल) तर अशा प्रवाशांना युएईतून ये/ जा करण्याची अनुमती नसेल. 

कोणाला मिळेल देशात ये/जा करण्याची संधी? 

ट्रेड पार्टनर इंडिगोच्या माहितीनुसार युएईचा निवासी/ स्थायी व्हिसा (Visa) असणाऱ्या आणि पासपोर्टवर फक्त एकेरी नाव असणाऱ्यांना मात्र प्रवास करता येणार आहे. पण, त्यांनी पहिलं नाव आणि आडनाव कॉलममध्ये Update करणं अपेक्षित असेल. रोजगार व्हिसा असणाऱ्यांसाठीही हाच नियम लागू असणार आहे. 

सध्याच्या घडीला या नियमाविषयी सविस्तर माहिती करुन घेण्यासाठी  goindigo.com या संकेतस्थळावर भेट द्या.