मुंबई : बुधवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी राजीनामा दिल्याचं वृत्तपत्र अमेरिकेच्या व्हाईट हाऊस परिसरात वाटण्यात आले. अमेरिकेच्या वॉशिंगटन पोस्ट वृत्तपत्रात ही बातमी आली आणि अनेक जण यानंतर जल्लोष करु लागले. जगभरात ही बातमी पसरली. या वृत्तपत्रात असं म्हटलं गेलं होतं की, ट्रंप यांनी व्हाईट हाऊस सोडलं, संकट संपलं'. या ४ कॉलमच्या बातमीमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांचा फोटो लावण्यात आला होता. ज्यामध्ये ते मान खाली घालून चिंतेत दिसत होते. या वृत्तपत्रात १ मे २०१९ ही तारीख देण्यात आली होती. पेनसिलवेनिया एवेन्यू आणि व्हाईट हाउसच्या बाहेर ही वर्तमानपत्र वाटण्यात आली. एका महिलेने म्हटलं की, वॉशिंगटन पोस्टचा हा विशेष लेख घ्या. हा मोफत आहे. तुम्हाला हा कुठेच नाही मिळणार. ही महिला एका पिशवीत आणलेले हे वृत्तपत्र वाटत होती.
हे प्रकरण समोर येताच वॉशिंगटन पोस्टने ट्विट करत स्पष्टीकरण दिलं. वॉशिंगटन पोस्टने म्हटलं की, ट्रंप यांच्या राजीनाम्याची बातमी असलेले खोटे वृत्तपत्र वितरीत करण्यात आले. या बनावट वृत्तपत्राशी वॉशिंगटन पोस्टचा कोणताही संबंध नाही. सध्या या घटनेची चौकशी सुरु आहे. या घटनेवर व्हाईट हाऊस आणि ट्रंप यांच्याकडून अजून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
अमेरिकेत मॅक्सिकोच्या भीतींवरुन वाद सुरु आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी मॅक्सिकोची भींत बनवण्यासाठी संसदेकडे फंडला मंजुरी देण्याची मागणी केली आहे. पण डेमोक्रेट्स पक्षाचे खासदार याच्या विरोधात आहे. अमेरिकेच्या खालच्या सभागृहात डेमोक्रेटिक पक्षाचं वर्चस्व आहे. येथे डोनाल्ड ट्रंप यांचा रिपब्लिकन पक्ष अल्पमतात आहे. सध्या या वादामुळे अमेरिकेत रिसेशन सुरु आहे.
अमेरिकेतील सरकारी कामे ठप्प आहेत. देशभरातील जवळपास ८ लाख कर्मचारी सुट्टीवर आहेत. काही जण पगाराविना काम करत आहेत. डोनाल्ड ट्रंप यांनी इशारा दिला आहे की, जर डेमोक्रेट्स याला मंजुरी देणार नाहीत तर तो आणीबाणी घोषित करतील. अमेरिकेत हे पहिल्यांदा झालेलं नाही. याआधी जेव्हा डोनाल्ड ट्रंप यांचा विरोध झाला होता तेव्हा देखील ट्रंप यांनी मुस्लीम व्यक्तींवर नजर ठेवण्यासारखे अनेक निर्णय घेतले होते. ज्यामुळे त्यांच्य़ावर जोरदार टीका झाली होती.