Viral News : इतिहासाची पाळंमुळं शोधण्याच्या कारणामुळं आजवर अनेक भागांमध्ये, अनेक महत्त्वपूर्ण क्षेत्रांमध्ये पुरातत्वं विभागापासून या क्षेत्रात सक्रिय असणाऱ्या अनेक संघटनांनी उत्खनन करत कैक अचंबित करणाऱ्या गोष्टी जगापुढे आणल्या आहेत. पुरातन काळातील नाणी, भांडी, गतकाळातील जीवनशैलीवर भाष्य करणारे मानवी संस्कृतीचे अनेक पुरावे आजवर समोर आले आहेत. त्यातच आता एक अशी गोष्ट अभ्यासकांच्या हाती लागली आहे, जी पाहून त्यांनाही आपण काहीतरी मोठा टप्पा साध्य केल्याची प्रचिती येत आहे.
फ्रान्समधील एका क्षेत्रामध्ये पुरातत्त्व विषयाचा अभ्यास करणाऱ्या काही विद्यार्थ्यांना एक कमाल गोष्ट हाती लागली. गॉलिश टाऊन येथे उत्खनन करतेवेळी त्यांच्या हाती एक लहानशी काचेची बाटली लागली. एका मातीच्या माठवजा भांड्यामध्ये ही बाटली सापडल्याची माहिती बीबीसीनं प्रसिद्ध केली आहे.
सूत्र आणि अभ्यासकांच्या मते 200 वर्षांपासून ही बाटली लपवण्यात आली होती, जिथं सापडलेल्या या बाटलीतील ही चिठ्ठी एका अभ्यासकाची असून, त्या अभ्यासकानंही या क्षेत्रामध्ये उत्खननाचं काम केल्याचं म्हटलं गेलं. Guillaume Blondel यांनी यावेळी या निरीक्षणपर मोहिमेचं नेतृत्त्वं तेलं असून, हाती लागलेल्या पुराव्यांना त्यांनी परीक्षणासाठी पाठवलं आणि चिठ्ठीतील मजकुरासह त्यावर लिहिलेलं नाव समोर आलं.
'"PJ Feret, a native of Dieppe, member of various intellectual societies, carried out excavations here in January 1825. He continues his investigations in this vast area known as the Cite de Limes or Caesar's Camp." असा मजकूर त्या चिठ्ठीमध्ये लिहिण्यात आला होता, या मजकुरासह अतिशय रहस्यमयीरित्या समोर आलेल्या या चिठ्ठीतील नावाचा प्रश्नही उत्तरी निघाला.
PJ Feret हे एक स्थानिक प्रस्थ असून, स्थानिक नोदींमध्ये नमूद असणाऱ्या माहितीनुसार त्यांनीही या भागात 200 वर्षांपूर्वी उत्खनन केल्याचे पुरावे आहेत. इतिहासकारांपासून पुरातत्वं विभागातील मंडळींसाठी हा एक मोठा टप्पा असून, येत्या काळात त्यांना गॉलिश गाव आणि संस्कृतीला आणखी जवळून निरीक्षण करण्याची संधी या चिठ्ठीच्या माध्यमातून मिळणार आहे असं म्हटलं जात आहे.