World Record : नेमकी ही कुठली फॅशन? 42 फूट नखं वाढवतं महिलेचा विश्व विक्रम, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

या महिलेने तिच्या नखांबाबतीत असं काही केलं की तिची नोंद चक्क गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये (Guinness World Record) करण्यात आली. 

Updated: Sep 26, 2022, 03:43 PM IST
World Record : नेमकी ही कुठली फॅशन? 42 फूट नखं वाढवतं महिलेचा विश्व विक्रम, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद   title=
Which fashion is this exactly 42 feet nail extension is a world record for a woman NZ

World Record : महिला कायमचं आपल्या केसांबाबत किंवा नखांबाबत विशेष काळजी घेताना दिसतात. केस वाढवून वेगवेगळ्या हेअर स्टाईल (Hair Style) साकरणं हे बऱ्याच महिलांना आवडतं. तसेच नखं वाढवत त्यावर रंगीबेरंगी नेलपेंट्स (Nailpaint) लावणे, नेल आर्ट (Nil Art) किंवा नेल पिअर्सिंग सारख्या विविध फॅशन (Fashion) महिला करताना दिसतात. पण या महिलेने तिच्या नखांबाबतीत असं काही केलं की तिची नोंद चक्क गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये (Guinness World Record) करण्यात आली. (Which fashion is this exactly 42 feet nail extension is a world record for a woman NZ)

आणखी वाचा... अबब! 'ही' आहे जगातली सर्वात उंच तरुणी; कर्तृत्वंच नाही तिची उंचीही जगात भारी

लोकांमध्ये विविध प्रकारचे रेकॉर्ड बनवण्याची क्रेझ असते. त्यांना जे काही करायचे आहे त्याला ते मनापासून करतात आणि मग रेकॉर्ड बनते. डायना आर्मस्ट्राँग नावाची 63 वर्षीय महिला. हिने  एक अनोखा विश्वविक्रम केला असून गेल्या 25 वर्षांपासून तिने नखे कापली नाहीत. यानंतर आता तिच्या नखांची लांबी (एकत्रित लांबी) 42 फूट 10 इंच आहे.  इतकी लांब नखं ठेवल्यानंतर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने (Guinness World Record) डायना आर्मस्ट्राँगच्या (Diana Armstrong) नावाचा आपल्या रेकॉर्ड बुकमध्ये समावेश केला आहे. पण एवढी लांब नखे असण्यामागे एक वेदनादायक कथा आहे. 

ही महिला अमेरिकेतील असून या महिलेच्या नावावर सर्वात लांब नखांचा विश्वविक्रम आहे. डायना यांच्या दोन्ही हातांच्या नखांची लांबी 42 फूट इतकी आहे. डायना यांनी एका मुलाखतीत सांगितले की,  त्यांनी गेल्या 25 वर्षांपासून हातांची नखं कापलेली नाहीत. डायना यांनी शेवटी नखं 1997 साली कापली होती. त्यानंतर त्यांनी नखं कापलेली नाहीत.

डायना सांगतात की, विश्वविक्रम घडवून आणावं म्हणून नखं वाढवली नाहीत. नेमकं कारण होते की, त्यांनी त्यांच्या मुलीच्या आठवणीत नखं वाढवण्यास सुरुवात केली. त्यांची मुलगी वयाच्या 16 व्या वर्षी दम्या या आजारामुळे मरण पावली. त्यांची मुलगी जिवंत असताना त्यांची नखं कापून त्यांना नेलपेंट लावायची. तिचा मृत्यू व्हायच्या आदल्या दिवशीही तिने तिच्या आईच्या म्हणजेच डायना यांच्या नखांना नेलपेंट लावली होती. यामुळे डायना यांनी दिवंगत मुलीच्या आठवणीत नखं वाढवण्यास सुरुवात केली.

आणखी वाचा...  घाईघाईनं कुठे निघाले शैलेश लोढा? 'तारक मेहता...' विषयी प्रश्न विचारताच दिलं अनपेक्षित उत्तर

या विक्रमाची 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'ने या संदर्भात अधिकृत घोषणा देखील केली आहे. प्रत्येक जण विश्वविक्रम घडावा म्हणून वेगवेगळे शर्तीचे प्रयत्न करत असताना. पण दिवंगत मुलीच्या आठवणीत  दोन्ही हातांच्या नखांची लांबी 42 फूट वाढवणारी आई मात्र पाहिल्यादांच पाहिली.