अँटार्कटीका : अँटार्कटीकाच्या किनाऱ्यापासून ते स्पेनच्या माजोरका बेटापर्यंत बर्फाचा एक विशाल तुकडा पाण्यात पडला आहे. सेटेलाइट आणि विमानाने घेतलेल्या फोटोमधून हे स्पष्ट होत आहे की, हा जगातील आतापर्यंतचा सर्वात महाकाय बर्फाचा तुकडा आहे. युरोपियन स्पेस एजन्सीनुसार, हा आइसबर्ग A-76 (Iceberg) अँटार्कटीकामधील रॉनी आईस शेल्फच्या पश्चिमेलाकडून तुटला आहे आणि तो वेडेल समुद्रात तरंगत आहे. 170 किलोमीटर लांब असलेला हा बर्फाता तुकडा 25 किलोमीटर रूंद आहे.
या तुकड्याच्या आकारावरून असे अनुमान लावले जात आहे की, तो न्यूयॉर्क बेटापेक्षा मोठे आहे आणि प्यूर्टो रिकोच्या अर्ध्या आकाराचा आहे. ग्लोबल वार्मिंगच्या वाढत्या धोक्याचे हे चिन्ह आहे असे म्हणायला आपल्याला काहीही हरकत नाही.
ग्लोबल वार्मिंगमुळे बर्फ वितळत चालला आहे आणि त्यामुळे समुद्राची पातळी सतत वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. पाण्याच्या पातळीत झालेल्या वाढीमुऴे मुंबईसारख्या बर्याच किनारी भागातली शहरे पाण्याखाली जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.
अँटार्कटीकामधील तापमान ग्लोबल वार्मिंगमुळे वेगाने वाढत आहे. ज्यामुळे येथील बर्फाच्या चादरी हळूहळू वितळू लागल्या आहेत. हिमनद्याही आता वितळायला सुरवात झाली आहे. त्यामुळे पाण्याच्या पातळीतही झपाट्याने वाढ होत आहे.
गेल्या वर्षी आईसबर्ग A-68A तुटून वेगळा झाला होता. त्यावेळी तो अँटार्कटीकामधील सर्वात मोठा तुकडा होता. शास्त्रज्ञांना अशी भिती होती की, तो टुकडा जर एखाद्या बेटावर आढळला तर खूप मोठे नुकसान होऊ शकते. कारण त्या बेटांवर मोठ्या संख्येने सील आणि पेंग्विन राहतात आणि त्यांची लोकसंख्या येथे खूपच जास्त आहे. परंतु सुदैवाने त्यापूर्वीच त्या विशाल तुकड्याचे छोटे छोटे तुकडे झाले.
1880 पासून, ते आतापर्यंत समुद्राच्या पातळत वाढ झाली आहे. ही वाढ सरासरी 9 इंचने झाल्याचे वैज्ञानिकांचे मत आहे. यामागील कारण हे ग्रीनलँड आणि अँटार्कटीकामधील वितळलेले बर्फ आहे.
नेचर मॅगझिनमध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार, जगातही दुसऱ्या ठिकाणचे हिमनग ही वेगाने वितळत आहे. ही सगळी परिस्थिती पाहाता वैज्ञानिकांचे असे म्हणणे आहे की, असाच जर बर्फ वितळत राहिला तर, सगळ्याच किनाऱ्यालगतची शहरे ही पाण्याखाली जाऊन नष्टं होऊ शकतात.