Boyfriend ला महिना 57 लाख रुपये पगार देणार! व्हायरल लव्ह स्टोरी वाचून चक्रावून जाल

Jene Parkx Love Story Viral: सोशल मीडियावर रोज अनेक बातम्या आणि किस्से व्हायरल होत असतात. या बातम्या वाचल्या की आपल्याला प्रश्न पडतो की, खरंच असं आहे का? सध्या अशीच एक लव्ह स्टोरी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात एक तरुणीने 'बॉयफ्रेंड हवा' यासाठी पगार देणार असल्याचं जाहीर केलं होतं.

Updated: Nov 15, 2022, 07:36 PM IST
Boyfriend ला महिना 57 लाख रुपये पगार देणार! व्हायरल लव्ह स्टोरी वाचून चक्रावून जाल title=

Jene Parkx Love Story Viral: सोशल मीडियावर रोज अनेक बातम्या आणि किस्से व्हायरल होत असतात. या बातम्या वाचल्या की आपल्याला प्रश्न पडतो की, खरंच असं आहे का? सध्या अशीच एक लव्ह स्टोरी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात एक तरुणीने 'बॉयफ्रेंड हवा' यासाठी पगार देणार असल्याचं जाहीर केलं होतं. थोडेथोडके नाही तर वर्षभरासाठी 57 लाख रुपये देणार असल्याचं जाहीर केलं होतं. स्कॉटलँडमध्ये राहणाऱ्या जेन पार्क (Jane Park) हीने ही घोषणा केली होती. तसेच यासाठी एक वेबसाईट देखील डिझाईन केली होती. या वेबसाईटवर अनेकांनी अर्ज देखील केला होता. जेन पार्क ही आता 26 वर्षांची असून मॉडेल आणि सोशल मीडिया इंफ्ल्युएंसर आहे. तिचे ग्लॅमरस फोटो चाहते आवडीने पाहतात. नुकताच एक व्हिडीओ शेअर करत तिने आपल्या लव्हस्टोरीबाबत सांगितलं आहे. तिची लव्हस्टोरी (Love Story) वाचून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.  

2013 मध्ये 17 वर्षीय जेननं 9.5 कोटी रुपयांची लॉटरी जिंकली होती. कमी वयात इतके कोटी कमवणारी व्यक्ती म्हणून तिचं नाव चर्चेत होतं. त्यानंतर आता लोकांचं लक्ष वेधण्यासाठी टिकटॉकवर बॉयफ्रेंडसोबत व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात तिने आपल्याला बॉयफ्रेंड मिळाल्याच जाहीर केलं आहे. त्यामुळे तिचा बॉयफ्रेंड होण्याचं अनेकांचं स्वप्न भंगलं आहे. 57 लाख रुपये आणि तिचा बॉयफ्रेंड होण्यासाठी अनेकांनी अर्ज केला होता.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Jane Park (@janeparkx)

Trending: एका रात्रीत महिलेचं नशिब पालटलं, जाणून घ्या कसे कमवले 3 कोटी!

सोशल मीडियावर तरुणी आणि तिच्या बॉयफ्रेंडचा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. सुरुवातीला व्हिडीओतील मुलगा तिचा फॅन असावा असा अंदाज बांधला होता. मात्र जेन पार्कने तो बॉयफ्रेंड असल्याचं खुलासा केला आहे. व्हिडीओत दोघं बाथटबमध्ये एक बसून किस करताना दिसत आहेत.