Ashadhi Ekadashi 2023 : पाऊले चालती पंढरीची वाट..! कधी आहे आषाढी एकादशी? जाणून घ्या तारीख आणि महत्त्व

Ashadhi Ekadashi 2023 : आषाढी वारी म्हटलं की, हृदयात विठूयाची भेटीची आस आणि पंढरपूरची वारी... वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सवाबद्दल जाणून घ्या एका क्लिकवर 

नेहा चौधरी | Updated: May 30, 2023, 02:18 PM IST
Ashadhi Ekadashi 2023 : पाऊले चालती पंढरीची वाट..! कधी आहे आषाढी एकादशी? जाणून घ्या तारीख आणि महत्त्व title=
ashadhi ekadashi 2023 date time and importance devshayani ekadashi 2023 mauli alandi tukaram maharaj dehu palkhi maharashtra

Ashadhi Ekadashi 2023 : पाऊले चालती पंढरीची वाट

                                                सुखी संसाराची तोडूनिया गाठ

                                               घेता प्रसाद श्री विठ्ठलाचा 
                                            
विठुरायाचे सावळे रुप डोळ्या सामावून घेण्यासाठी हजारो वारकरी ऊन्हा पावसाची पर्वा न करता दिवस रात्र पंढरपूरच्या दिशेने चाल असतात. धानीमनी एकच ध्यास विठुमाऊलीचं दर्शन. आषाढी एकादशीच्या एक महिन्यापासून अख्ख महाराष्ट्र विठूरायाच्या भक्तीत न्हावून निघतं. यंदा आषाढी एकादशी कधी आहे. पालख्या कधी मार्गस्थ होणार याबद्दल जाणून घेऊयात. (Ashadi Ekadashi Wari 2023) 

कधी आहे आषाढी वारी?

महाराष्ट्रामध्ये आषाढी एकादशी आणि वारीला अनन्य साधारण महत्त्व आहे. विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी पंढरपूर (Pandharpur) वारीला जाण्याची शेकडो वर्षांची परंपरा आहे. दोन वर्ष कोरोनामुळे वारीला ब्रेक लागला होता. गेल्या वर्षीपासून ही परंपरा पुन्हा सुरु झाली. (Ashadhi Ekadashi 2022 Date) 

पंचांगानुसार 5 जून 2023 पासून आषाढ महिना सुरु होणार आहे. या महिन्यातील शुक्ल एकादशी तिथीला आषाढी एकादशी साजरी केली जाते. हिंदू धर्मात या एकादशीला देवशयनी एकादशी (Devshayani Ekadashi 2023)असंही म्हणतात. असं म्हणतात की यानंतर भगवान विष्णू 4 महिन्यांसाठी योगनिद्रामध्ये जातात. (ashadhi ekadashi 2023 date time and importance devshayani ekadashi 2023 mauli alandi tukaram maharaj dehu palkhi maharashtra)

पंचांगानुसार आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील आषाढी एकादशी 29 जून 2023 रोजी पहाटे 03.18 वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी 30 जून 2023 रोजी पहाटे 02.42 वाजता समाप्त होईल.

कधी निघणार पालख्या ?

लाखो वारकरी आषाढी एकादशीच्या दिवशी संत महंतांच्या वारी (Ashadi Ekadashi Wari 2023) घेऊन पंढरपुरात विठुरायाच्या भेटीसाठी मैलोन् मैल पायी चालत येतात. या वारीत आळंदीहून ज्ञानेश्वर माऊलीची (Dnyaneshwar Mauli), देहू येथून संत तुकारामांची (Saint Tukaram), त्रंबकेश्वरवरून निवृत्तीनाथांची आणि पैठणहून संत एकनाथ महाराजांची (Saint Eknath Maharaj) पालखी पंढरपूरमध्ये दाखल होते. 

 माऊलींचा पालखी सोहळा

11 जून 2023, रविवारी सायंकाळी 4 वाजता ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आळंदी मंदिराच्या दर्शन मंडपातून प्रस्थान ठेवणार आहे. त्यानंतर ही पालखी वारकऱ्यांसह पुणे भवानीपेठ, पुणे, सासवड, जेजुरी, वाल्हे, लोणंद, तरडगाव, विमानतळ फलटण, बरड, नातेपुते, माळशिरस, वेळापूर, भंडीशेगाव, वाखरी असा प्रवास करुन 28 जून 2023 पंढरपुरात दाखल होणार आहे. 3 जुलैपर्यंत पालखी पंढरपुरातच मुक्कामी असणार आहे. विठ्ठल- रुक्मिणीभेटीनंतर पालखीचा परचीचा प्रवास वाखरीहून सुरु होईल. 

तुकोबारायांच्या पालखीचा प्रवास 

आळंदीहून माऊलींची पालखी प्रस्थान ठेवण्यापूर्वी श्री संत तुकाराम महाराजांची पालखी श्री क्षेत्र देहूमधून प्रस्थान ठेवेल. 10 जून 2023 ला ही पालखी ईनामदार साहेब वाडा, देहूमध्ये प्रस्थान ठेवेल. मग ही पालखी आकुर्डी, नानापेठ पुणे, लोणी काळभोर, यवत, वरवंड, उडंबडी गवळ्याची, बारामती, सणसर, आंथुर्णे, निमगाव केतकी, इंदापूर, सराटी, अकलूज, बोरगाव, पिराची कुरोलीमार्गे वाखरीला पोहोचेल. 28 जून 2023 ला पालखी पंढरपुरात संत तुकाराम महाराज मंदिर (नवी इमारत) इथे मुक्कामी असणार आहे. त्यानंतर 29 जून 2023 ला पालखीची नगर प्रदक्षिणा सोहळा पार पडेल.  

आषाढी एकादशीचे महत्त्व (Importance of Ashadi Ekadashi)

टाळ, मृदुंगाच्या आवाजात लाखो वारकीर पंढरपूरकडे जातानाचे दृष्य आणि प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जण आतुर असतो. जे लोक वारीला जाऊ शकत नाहीत ते या दिवशी उपवास करुन घरीच मनोभावे विठ्ठलाची पूजा करतात. त्याशिवाय आषाढीच्या एकादशीच्या वारीला जाण्यापूर्वी शेतकरी आपल्या शेतात पेरणी करतात. पंढरपूरला जाऊन विठुरायाला साकडं घालतात. 

देवशयनी एकादशीचे महत्त्व (Importance of Devashyani Ekadashi)

धार्मिक मान्यतेनुसार मनुष्याचं एक वर्ष हे देवांची एक अहोरात्र असतं. दक्षिणायन ही देवांची रात्र असतं आणि उत्तरायण हा दिवस असतो. आषाढ महिन्यातील कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होते आणि दक्षिणायनाला सुरुवात होते. या काळात देवांची रात्र असते त्यामुळे सर्व देव झोपी जातात. यामुळेच आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असंही म्हणतात. या दिवशी भगवान श्री विष्णूंची पूजा करण्याला अतिशय महत्त्व आहे.