Ashadhi Ekadashi 2023 : हेची व्हावी माझी आस।
जन्मोजन्मी तुझा दास।।१।।
पंढरीचा वारकरी ।
वारी चुको नेदी हरी।।२।।
माऊलीच्या भेटीला लाखो वारकरी (Pandharpur Wari 2023) लहान थोर, गरीब श्रीमंत सगळा भेद विसरून एक रंगी एक मुखी वारीला निघाले आहेत. अख्ख महाराष्ट्र विठुमय झालं आहे. आषाढी एकादशीला अवघे काही दिवस राहिले आहे. विठुरायाच्या भेटीची आस घेऊन पावलं पंढपुराकडे (Ashadhi Wari) निघाले आहेत.
मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे पण अजून पावसाने हजेरी लावलेली नाही. त्यामुळे शेतकरी वर्गाचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. अशातच एका आजीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये विठुरायासमोर एक आजीची हृदयस्पर्शी याचना पाहून आपलेही डोळे पाणवतात.
ही आज्जी अगदी धायमोकलून माऊलीकडे आपली व्यथा मांडत आहे. विठुराया हा अवघ्या जगाचा पिता असल्याने प्रत्येक जण आपली व्यथा घेऊन पायपीट करत माऊलीच्या दरबारी येतात. 'सकळही तीर्थे निवृत्तीच्या पायी, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम.... ज्ञानेश्वर माउली तुकाराम, असा हरिनामाचा गाजर हे वारीकरी आपल्या पितृछायेत पोहोचतात.
आजीचा हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील warkari_pandharicha या अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. त्यानंतर हा व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. आजीचा हा हृदय पिळवटून टाकणारा व्हिडीओ जुना आहे. पंढरीचा माऊली हा प्रत्येकाचा हक्काचा माणूस आहे. (Ashadhi Ekadashi 2023 woman crying front of Pandharpur vithhal old video viral on Internet trending video today on google )
संत निवृत्तीनाथ महाराज पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली असून संत मुक्ताबाईंची पालखीही पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे. मुक्ताबाईंची पालखी आज पारगावला विसावा घेणार आहे.