मुंबई : विद्यार्थ्यांसाठी एक गुड न्यूज आहे. विद्यार्थ्यांना आता मैदानावर खेळण्यासाठी अधिक वेळ दिला जाणार आहे. कारण क्रीडा आणि कला विषयाच्या तासिका दोनवरुन चारपर्यंत वाढवण्यात आल्यात.
सध्या शाळांमध्ये क्रीडा आणि कला विषयासाठी आठवड्यातून दोन तासिका दिल्या जातायत. आता विद्यार्थ्यांना अधिक दोन तासिका खेळण्यासाठी मिळणार आहे.
गेल्या काही महिन्यांपासून शिक्षक वर्गातूनही तासिका वाढवण्याची मागणी केली जात होती. त्यानुसार, शिक्षण विभागाकडून नुकतेच एक नवीन परिपत्रक जारी करण्यात आलं आहे.
बुधवार आणि गुरुवारी या अधिकच्या तासिका घ्यायच्या असून स्थानिक परिस्थितीनुसार मुख्याध्यापकांनी वेळापत्रक तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्यात.
महत्वाचे म्हणजे या निर्णयानंतर विद्यार्थ्यांच्या शाळेच्या वेळेत 10-15 मिनिटांनी वाढ होण्याची शक्यता आहे.