मुंबई : महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या १० वीच्या परीक्षेचा निकाल पुढील आठवड्यात जाहीर करण्यात येणार आहे.
व्हॉट्सअप आणि फेसबूकसारख्या सोशल मिडीयावर फिरणा-या निकालाच्या तारखांवर विश्वास ठेऊ नये असं आवाहन करणारं परिपत्रक एसएससी बोर्डानं प्रसिद्ध केलंय.
याबाबतची तारीख महामंडळामार्फत अधिकृत संकेत स्थळासह वृत्तपत्र आणि इतर प्रसिद्धि माध्यमातून दिली जाईल अशी माहितीही देण्यात आली आहे.