मुंबई : रंगांचा सण होळी अगदी दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. या सणाला रंगात रंगताना आपल्या जीवनाचा अभिवाज्य भाग झालेला मोबाईल फोन आपण दूर सारू शकत नाही. सेल्फीसाठी तर मोबाईल लागतोच. अशावेळी मोबाईलचे कोणतेही नुकसान न करता होळीच्या दिवशी त्याचा कसा वापर कराल? त्यासाठी काही खास टिप्स....
१. ओल्या हाताने मोबाईल हाताळू नका. हात नीट पुसा, कोरडे करा आणि मग मोबाईल हाताळा.
२. होळीच्या दिवशी ठिकठिकाणी मुले पाण्याचे फुगे, पिचकाऱ्या घेऊन खेळताना दिसातात. त्यामुळे बाहेर पडताना मोबाईलसाठी वॉटरप्रूफ कव्हर वापरा.
३. होळी खेळताना प्रथम मोबाईल झीप लॉक पाऊच किंवा वॉटरप्रूफ बॅगमध्ये ठेवा. हे पाऊच बाजारात तुम्हाला सहज उपलब्ध होतील.
४. डोकं भिजलेले असल्यास मोबाईल फोनचा वापर करु नका. कारण कानावरवरून पाणी मोबाईलमध्ये जाऊ शकते.
५. होळीच्या दिवशी जर तुम्ही मोबाईल घेऊन बाहेर जात असताना इअरफोन किंवा ब्लूटुथचा वापर अवश्य करा.
६. खूप काळजी घेऊनही मोबाईलमध्ये पाणी गेले असल्यास कॉल रिसिव्ह करु नका किंवा मोबाईलवरुन कोणालाही फोन करू नका.
७. मोबाईल फोनमध्ये पाणी गेले असल्यास फोन स्विच ऑफ करा आणि त्याची बॅटरी बाहेर काढा. त्यानंतर सुती कापडाने फोन व्यवस्थित पुसा.
८. मोबाईल पूर्णपणे सुकल्यानंतरच ऑन करा.
९. मोबाईल भिजल्यानंतर तो सुकवण्याचा सोपा उपाय म्हणजे तो तांदळाच्या डब्यात ठेवा. त्यामुळे फोनच्या आतील ओलावा पूर्णपणे निघून जाईल.
१०. तसंच मोबाईल सुकवण्यासाठी तुम्ही हेअर ड्रायरचा वापर करु शकता. मात्र ही योग्य पद्धत नाही त्यामुळे मदर बोर्डमध्ये समस्या येण्याची शक्यता अधिक असते.