कोणत्या रुग्णांनी शारीरिक संबंध ठेवू नयेत? तज्ज्ञ म्हणतात लैंगिक जीवन सुधारण्यासाठी...

Sexual Health Tips : विवाहिक जीवनात शारीरिक संबंध हे महत्त्वाच असतं. पण काही कारणामुळे जोडप्यामध्ये शारीरिक संबंध नसेल तर त्यांचा शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. त्यात जर जोडप्यातील एकालाही गंभीर आजार असेल तोही कायमस्वरुपी तर त्याचा परिणाम लैंगिक जीवनावर होतो.     

नेहा चौधरी | Updated: Feb 20, 2025, 07:36 PM IST
कोणत्या रुग्णांनी शारीरिक संबंध ठेवू नयेत? तज्ज्ञ म्हणतात लैंगिक जीवन सुधारण्यासाठी...

Sexual Health Tips : वैवाहिक जीवनात प्रेम, विश्वाससह शारीरिक संबंध हे महत्त्वाची भूमिका बजावतात. आजही भारतात लैंगिक जीवनाबद्दल पुरुष असो किंवा स्त्री मोकळेपणाने बोलत नाही. त्यामुळे आजही अनेक जोडप्यामध्ये लैंगिक जीवनाबद्दल काही समज गैरसमज आहेत. जोडप्यांना शारीरिक संबंध ठेवण्याबद्दल अनेक प्रश्न आजही आहेत. पण त्याबद्दल ते कोणाशीही मोकळेपणाने बोलत नाहीत, की त्याच उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत नाहीत. अनेक जोडप्यांना असाही प्रश्न पडतो की, कोणत्या आजारात त्यांनी शारीरिक संबंध ठेवावे की नाहीत? तर यावरच आम्ही तज्ज्ञांशी संवाद साधलाय. त्यात असं आढळून आलं की, मधुमेह रुग्णांमध्ये शारीरिक संबंध ठेवण्याबद्दल संभ्रम आहे. 

मधुमेह हा झपाट्याने पसरणारा आजार असून प्रौढ लोकसंख्येपेक्षा तरुणांमध्ये मधुमेहाच्या रुग्णांच्या संख्येत आश्चर्यकारक वाढ होताना दिसून येत आहे. मधुमेह हा कायमस्वरुपी आजार असून यामुळे रुग्णावर अनेक बंधन येतात. त्याचा आहारापासून जीवनशैलीमध्ये बदल होतात. मधुमेहाच्या रुग्णाने शारीरिक संबंध ठेवू नयेत असा एक सामान्य समज असल्याच तज्ज्ञ सांगतात. मधुमेहाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात हा प्रश्न विचारतात की, आता यापुढे ते शारीरिक संबंध ठेवू शकतात की नाही? 

तज्ज्ञ सांगतात की, शारीरिक संबंधांचे आपल्या शरीरासाठी अनेक फायदे मिळत असतात. लैंगिक जीवन आनंदी असल्यास जोडप्याचा रक्तदाब कमी होण्यास फायदा मिळतो. त्यामुळे तणाव आणि चिंता कमी होते. आता आपण जाणून घेऊयात मधुमेह रुग्ण शारीरिक संबंध ठेवू शकतात की नाही. तर क्लीव्हलँड क्लिनिकमध्ये प्रकाशित झालेल्या लेखानुसार, एंडोक्राइनोलॉजिस्ट आणि एमडी शिरीष अवधानुला याबद्दल सांगण्यात आलंय. या अहवालात असं म्हटलंय की, मधुमेहामुळे लैंगिक संबंधांवर संभाव्य परिणाम होण्याची शक्यता असते. शारीरिक संपर्कामुळे रक्तदाब कमी होऊन तणाव आणि चिंता कमी होण्यास मदत होते हे खरं आहे. मात्र जर तुम्हाला टाईप 2 मधुमेह असेल तर, शारीरिक संबंध तुमच्यासाठी फायदेशीर ठरत नाही. क्लीव्हलँड क्लिनिकमध्ये प्रकाशित झालेल्या लेखात एंडोक्राइनोलॉजिस्ट शिरीशा अवधानुला, एमडी यांनी सांगितलं की, मधुमेहामुळे तुमच्या लैंगिक क्षमतेवर परिणाम होत असतो. 

तर 2010 मध्ये जर्नल ऑफ डायबिटीज केअरमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार असं नमुद करण्यात आलं की, 50% पुरुष आणि 19% मधुमेह असलेल्या स्त्रिया त्यांच्या लैंगिक समस्या डॉक्टरांना सांगत देखील नाहीत. त्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. 

मेडिकल न्यूज टुडेच्या अहवालानुसार, मधुमेही रुग्णांचे शरीर हे कमकुवत होतं. त्यामुळे त्यांना लैंगिक संबंधादरम्यान इरेक्शनच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते. पण हे सामान्य असलं तरी या समस्येवर किंवा आजारावर मात करण्यासाठी आपल्या आहाराकडे विशेष लक्ष दिल्यास अनेक गोष्टी सहज होऊ शकतात. मधुमेहग्रस्त असलेल्या पुरुषांपैकी केवळ 20 ते 75 टक्के पुरुषांनाच ही समस्या जाणवते. तर मधुमेह असलेल्या पुरुषांना सामान्य पुरुषांपेक्षा इरेक्टाइल डिसफंक्शनचा त्रास होण्याची शक्यता दोन ते तीन टक्के जास्त असल्याचे तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे मधुमेह रुग्णाचा लैंगिक जीवनावर त्याचा परिणाम होतो. पण तज्ज्ञ सांगतात या रुग्णांनी डॉक्टरांशी संपर्क साधून समस्या सांगितल्यास लैंगिक जीवनातील समस्या सुधारण्यास मदत मिळू शकते. पण त्यासाठी या रुग्णांनी बोलणे गरजेचे आहे.