Akshaye Khanna Aamir Khan Taare Zameen Par : बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्ना सध्या 'छावा' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात त्यानं औरंगजेब ही भूमिका साकारली आहे. अक्षयप्रमाणे त्यानं त्याच्या करिअरमध्ये पाथ-ब्रेकिंग चित्रपट आणि अभिनयानं सगळ्यांची मने जिंकली. पण तुम्हाला माहितीये का अक्षय खन्ना कधी 'तारे जमीं पर' या चित्रपटात काम करणार होता. अमोल गुप्तेनं या चित्रपटाची पटकथा लिहिली होती आणि त्यांना हा चित्रपट अक्षय खन्नासोबत करायचा होता. पण आमिरनं तो चित्रपट केला. अक्षय खन्नानं 2022 मध्ये एक मुलाखत दिली. त्या मुलाखतीत त्यानं सांगितलं की कशा प्रकारे आमिरनं त्याच्याकडून 'तारे जमीं पर' हा चित्रपट हिसकावून घेतला. त्यासोबत असं देखील म्हटलं की त्याला याचा आता पश्चाताप नाही.
'तारे जमीं पर' हा चित्रपट 2007 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाची निर्मीती आणि दिग्दर्शन हे आमिर खाननं केलं. त्यासोबत अभिनय देखील केलं. पण जेव्हा अमोल गुप्तेनं स्क्रिप्ट लिहिली होती, तर त्याच्या डोक्यात हीरोसाठी अक्षय खन्नाचं नाव होतं. तर अक्षयला ते ओळखत नव्हते, त्यामुळे आमिर खाननं प्रयत्न केले पण आमिरनं तो चित्रपट घेतला. अक्षय खन्नानं याविषयी नुकत्याच 'मिड डे' ला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं की 'त्यांनी आमिरशी संपर्क केला कारण तो आमिरचा मित्र होता आणि म्हणाला, मला खरोखर ही पटकथा अक्षयला ऐकवायची आहे. मी त्याला ओळखत नाही, पण तू नुकताच त्याच्यासोबत 'दिल चाहता है' या चित्रपटात काम केलं आहेस, तर तू त्याला फोन करून सांगू शकतोस का की मला माझी ही पटकथा त्याला ऐकवायची आहे.'
अक्षयनं पुढे सांगितलं की 'आमिरनं त्यांना सांगितलं की मी तोपर्यंत कोणत्याही स्क्रिप्टला रेकमेंड करु शकत नाही. जो पर्यंत मी स्वत: ती ऐकत नाही. त्यामुळे पहिल्यांदा मला ऐकव आणि जर मला आवडली तर मी अक्षयला सांगेल. आमिरला ही स्क्रिप्ट इतकी आवडली की त्यानं स्वत: हा चित्रपट करण्याचा निर्णय घेतला.'
हेही वाचा : रोल्स रॉयस गाडी खरेदी करणारी पहिली भारतीय अभिनेत्री माहितीये का? फक्त 1200 रुपये होता पगार
अक्षय खन्नानं पुढे सांगितलं की 'कशा प्रकारे एकदा आमिर खाननं त्यांना सांगितलं की अमोल गुप्ते त्यांच्यासाठी एक चित्रपट घेऊन आला होता. पण त्यानंच तो चित्रपट केला. अक्षयनं सांगितलं की एक दिवस एका स्टुडियोमध्ये मी शूटिंग करत होतो. मला आता आठवत नाही, मेहबूब होता असं मला वाटतं आणि आमिर देखील एका चित्रपटाचं शूटिंग करत होता. त्यामुळे मी फक्त हाय बोलण्यासाठी त्याच्या व्हॅनमध्ये गेलो. तेव्हा त्यानं सांगितलं की तुला माहितीये की काय झालंय आणि मी त्यांना मी तुमच्या जवळ येण्याची परवानगी दिली नाही आणि मी स्वत: चित्रपट बनलवला. तर मी म्हणालो की ठीक आहे काही हरकत नाही.'