'आशा होती की, आम्ही सहजीवनाची 30 वर्षे पूर्ण करु, पण...' घटस्फोटावर A R Rahman ची पहिली प्रतिक्रिया

संगीतकार ए आर रहमान आणि त्याची पत्नी सायरा बानो घटस्फोट घेत आहे. लग्नाच्या 29 वर्षांनंतर दोघांनी एवढा मोठा निर्णय घेतला आहे. या सगळ्या प्रकरणावर ए आर रहमानने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Nov 20, 2024, 10:40 AM IST
'आशा होती की, आम्ही सहजीवनाची 30 वर्षे पूर्ण करु, पण...' घटस्फोटावर A R Rahman ची पहिली प्रतिक्रिया title=

ऑक्सर विजेता संगीतकार ए आर रहमान आणि त्याची पत्नी सायरा बानो 29 वर्षांचा संसार मोडून घटस्फोट घेत आहेत. त्यांचे वकील वंदना शाह यांनी मंगळवारी 19 नोव्हेंबर 2024 रोजी माहिती दिली आहे. नात्यामध्ये सर्वाधिक भावनात्मक तणावानंतर हे दोघं या निर्णयावर पोहोचल्याचं वकील वंदना शाह यांनी सांगितलं आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणावर संगीतकार ए आर रहमानने पहिल्यांदा याबाबत सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आहे. 

वंदना शाह यांनी मीडियाला दिलेल्या निवेदनानुसार, 'लग्नाच्या अनेक वर्षानंतर सायरा आणि एआर रहमान यांनी एकमेकांपासून विभक्त होण्याचा कठीण निर्णय घेतला आहे. त्यांच्या नात्यात बराच भावनिक ताण आल्यावर हा निर्णय घेण्यात आला आहे.

ए आर रहमानची पहिली प्रतिक्रिया 

एक्सवरील पोस्टमध्ये एआर रहमान म्हणाला की, 'आम्हाला आशा होती की आम्ही 30 वर्षे पूर्ण करू, परंतु असे दिसते की हा सर्व गोष्टींचा अदृश्य अंत आहे. तुटलेल्या अंतःकरणाच्या भाराखाली देवाचे सिंहासन देखील हलू शकते. तरीही, या विखुरण्यात आपल्याला अर्थ सापडतो, जरी तुकडे पुन्हा त्यांची जागा शोधत नाहीत. आमच्या मित्रांनो, आम्ही या नाजूक काळातून जात असताना आमच्या गोपनीयतेचा आदर केल्याबद्दल तुमचे आभार मानतो. 

असा आहे परिवार 

सायरा बानो आणि ए आर रहमान यांचं 1995 साली लग्न झालं. या दोघांना तीन मुले असून दोन मुली खतीजा, रहीमा आणि मुलगा अमीन असं त्यांचं नाव आहे. सायरा बानो यांनी पहिल्या स्टेटमेंटमध्ये वेगळं होण्याची माहिती दिली होती. दोघांनी या निर्णयाचा खूप काळ विचार केला असून या निर्णयापर्यंत पोहोचले आहे. कोणताही निर्णय घाई गडबडीत घेतलेला नाही. सायरा यांनी रिलीज केलेल्या प्रेस नोटमध्ये मी या नात्याला टिकवू नाही शकल्याच म्हटलं आहे. शेवटी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. 

एक वर्षात काय बदललं 

2023 मध्ये विकातन अवॉर्ड दरम्यान सायरा बानो यांच्या तामिळ बोलण्यावरुन चर्चा झाली होती. सायरा तामिळ भाषा बोलत नसल्यामुळे त्यांची मातृभाषा काय यावर प्रश्न विचारण्यात आला. यावेळी रहमानने ही बाजू सांभाळून घेत कच्छ आणि इंग्रजी या दोन भाषांमध्ये सायरा उत्कृष्ठ संवाद साधू शकल्याचं सांगितलं. पण मग एका वर्षात असं काय झालं? असा सवाल आता चाहते विचारत आहेत.