अमिर खानच्या मुलीचे बॉयफ्रेंडसोबतचे बेडरूममधील 'ते' फोटो व्हायरल...

सुपरस्टार आमिर खानची मुलगी इरा खान तिच्या बिंधास्त लाईफस्टाईलसाठी प्रसिद्ध आहे. 

Updated: Jun 17, 2022, 07:11 PM IST
अमिर खानच्या मुलीचे बॉयफ्रेंडसोबतचे बेडरूममधील 'ते' फोटो व्हायरल... title=

मुंबई : सुपरस्टार आमिर खानची मुलगी इरा खान तिच्या बिंधास्त लाईफस्टाईलसाठी प्रसिद्ध आहे. इरा खान अनेकदा तिच्या बॉयफ्रेंडसोबतचे एकापेक्षा एक फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. या एपिसोडमध्ये आता पुन्हा एकदा इरा खानने बॉयफ्रेंडसोबतचा एक रोमँटिक फोटो शेअर केला आहे. जो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा फोटो इरा खानने इन्स्टाग्राम स्टोरीवर टाकला आहे.

डेट नाईट बोल्ड फोटो
या फोटोमध्ये इरा खान आणि तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरे बाथरोबमध्ये दिसत आहेत. बेडरूममध्ये दोघांची ही आरामदायक स्टाईल चाहत्यांना खूप आवडते. फोटो शेअर करत इरा खानने लिहिलं आहे की मॅचिंग रॉब्स, डेट नाईट. यासोबतच त्याने नुपूरलाही टॅग केलं आहे. या जोडप्याचा हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे आणि इराच्या या बोल्ड स्टाइलवर नेटिझन्सचा घायाळ होत आहेत.

इराच्या बर्थडे सेलिब्रेशनचे फोटो
याआधी इरा खानच्या बर्थडे सेलिब्रेशनच्या फोटोंनी सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली होती. वाढदिवसाच्या निमित्ताने इरा खान बिकिनीमध्ये तिच्या मित्र आणि कुटुंबासोबत सेलिब्रेशन आणि पूल पार्टी करताना दिसली.

इराचे हे फोटो पाहिल्यानंतर तिच्या बॉलिवूड डेब्यूबाबत अटकळ बांधली जात आहे. फोटो पाहिल्यानंतर, हे स्पष्ट होतं की इरा खऱ्या आयुष्यात ग्लॅमरच्या बाबतीत बॉलिवूड नायिकांना जबरदस्त स्पर्धा देते.