मुंबई : बॉलिवूडची आशिकी गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेली अनु अग्रवाल आज तिचा ५३ वा वाढदिवस साजरा करत आहे. अनुने वयाच्या २१ व्या वर्षी आशिकी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटाने अनुचे आयुष्य रातोरात बदलून टाकलं होतं. लोकं तिच्या सौंदर्याने मोहित झाले आणि तिची एक झलक पाहण्यासाठी तिच्या घराबाहेर तासनतास रांगा लावत असत, पण अचानक काहीतरी असं घडलं ज्यामुळे अनुचं संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं.
1999 मध्ये अनु मुंबईत एका कार अपघाताची बळी ठरली. या अपघातात तिचे प्राण वाचले. अनुला गंभीर दुखापत झाली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अनुने 29 दिवस मृत्यूशी लढाई लढली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेव्हा अनुला शुद्ध आली तेव्हा तिची स्मरणशक्ती पूर्णपणे नष्ट झाली होती आणि तिला काहीच आठवत नव्हतं.
अनुवर जवळपास चार वर्षे उपचार सुरु होते आणि त्यानंतर तिची स्मरणशक्ती काही प्रमाणात परत आली.आता अनु पुर्णपणे बरी आहे पण तिचं आयुष्य रुळावर यायला खूप वेळ लागला. अनुने योग आणि अध्यात्माचा आश्रय घेऊन स्वतःला सावरलं आणि आता ती स्वतः योगशिक्षिका बनली आहे. एका मुलाखतीत अनुने तिच्या आयुष्याविषयी सांगितलं आहे. ''1999 मध्ये एका अपघातानंतर मी कोमात गेली होती. अपघातापूर्वी मी एका आश्रमात राहत होती जिथे माझं आध्यात्मिक नाव होतं.
अपघातानंतर मला काहीच आठवत नव्हतं पण माझं आध्यात्मिक नाव मला तेव्हाही आठवत होतं. 2001 मध्ये, मी संन्यास घेतला होता. आणि माझं मुंडन केलं. 2006 मध्ये मी जगासमोर आले आणि लोकांना भेटू लागले. अपघातानंतर, मी लिपस्टिक लावायचं देखील विसरुन गेले होते आणि माझा 'बिफोर' आणि 'आफ्टर'वाला नो मेकअप कोणतेही मेकअप फोटो नव्हता. मला शॉक बसत होता.