Secrets of Shivling: अवघ्या काही दिवसांवर महाशिवरात्रीचा उत्सव येऊन ठेपला आहे. येत्या बुधवारी 26 मार्चला महाशिवरात्रीचा सण साजरा करण्यात येणार आहे. माघ महिन्यातील महाशिवरात्रीची माघ कृष्ण चतुर्दशी तिथी खास मानली गेली आहे. या तिथीला महादेवांनी तांडव नृत्य केले होते अशी आख्यायिका शास्त्रात सांगण्यात आलंय. उत्तर भारतात हाच दिवस फाल्गुन महिन्यातील असून या सणाला भक्तगण उपवास करतात आणि रात्रभर शंकराची आराधना करण्यात मग्न असतात. देवांचा देव महादेव यांची आराधना केल्यानंतर जीवनात सुख समृद्धी नांदते. महादेव जेवढे क्रोधीत होतात तेवढेच ते भोलेनाथ या नावानेही ओळखले जातात. कारण भगवान शंकर हा कोमल हृदयाचा आणि करुणा असलेला देव मानला गेलाय. पण जेव्हा आपण महादेव मंदिरात जातो, तेव्हा शिवलिंगावर एक पाण्याने भरलेला कलश असतो. त्यातून थेंब थेंब पाणी शिवलिंगावर पडतं असतं. तुम्हाला यामागील रहस्य माहितीये का?
धार्मिक शास्त्रानुसार शिवलिंगावरील कलशातून पाणी टपकण्याचे रहस्य सांगण्यात आलंय. शिवपुराणात असं सांगण्यात आलंय की, महादेवाने समुद्रमंथनाच्या वेळी 14 रत्नांपैकी एक विष बाहेर पडले, भगवान शिवाने ते विष प्यायले त्यांचे डोकं आणि घसा गरम झाले होते. त्यानंतर महादेवाला थंड करण्यासाठी त्यांच्यावर पाणी टाकण्यात आलं होतं. त्यामुळे महादेवांना थोडा आराम मिळाला होता. तेव्हापासून महादेवाला जलाभिषेक खूप आवडू लागला असं, शिवपुराणात सांगण्यात आलं. त्यामुळे धर्मशास्त्रात शिवलिंगावर जलाभिषेक करणे शुभ मानले गेले आहे. त्यामुळेच महादेवांचे डोके आणि घसा थंड ठेवण्यासाठी शिवलिंगाच्या वर पाण्याचे कलश ठेवण्यात येतं. ज्यामुळे 24 तास शिवलिंगावर थेंब थेंब पाणी पडत राहतं. असे मानले जाते की जो भक्त शिवलिंगावर जलाभिषेक करतो, त्याच्यावर भगवान शंकराची कृपा सदैव राहत असते. भगवान शिवावर उष्णतेच्या मोठ्या प्रभावामुळे, भगवान शिव देखील खूप क्रोधित होतात, ज्याला हलाहल म्हणतात, म्हणून असे केले जाते जेणेकरून क्रोध शांत होईल आणि मन, मेंदू आणि शरीर थंड होईल. जो व्यक्ती घागर दान करतो, जो घागरात छिद्र करतो, तो त्यात पाणी भरतो आणि भगवान शिवावर ठेवतो आणि थेंब थेंब पाणी ओततो. त्यांच्यावर भगवान शिवाचे विशेष आशीर्वाद आहेत. भगवान शिव प्रसन्न होतात आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचे रक्षण होते आणि त्यांच्या सर्व वाईट कृत्यांचे क्षमा होते.
मंदिरातील शिवलिंगावर ठिबकणारे पाणी एका छोट्या नळीतून बाहेर पडते हे तुम्ही पाहिलेच असेल. या नळीला जलाधारी, असे म्हणतात. धार्मिक शास्त्रानुसार कोणत्याही मंदिरात शिवजींना प्रदक्षिणा घालताना हा जलाधारी ओलांडू नये, जलाधारी ओलांडला जाऊ नये, म्हणूनच महादेवाला नेहमी अर्धीच प्रदक्षिणा घातली जाते.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)