Goenka Temple Fatehpur : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) चे माजी चेअरमन एएस किरण कुमार यांनी सोमवारी उत्तर प्रदेशातील फतेहपुर येथे असणाऱ्या जगप्रसिद्ध गोयनका मंदिराला भेट दिली. या दरम्यान त्यांनी माता बीरा बरजीचे दर्शन घेऊन येथे पूजा केली. गोयनका मंदिर संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी यावेळी एएस किरण कुमार यांचे स्वागत केले. मंदिरात दर्शन घेतल्यावर संवाद साधत असताना एएस किरण कुमार म्हणाले भारताने अवकाश तंत्रज्ञानात प्रचंड प्रगती केली असून आज आपण अवकाश संशोधनात जगातील पहिल्या पाच देशांमध्ये आहोत.
चांद्रयान 2 या मिशनच्या अपयशाविषयी बोलताना ते म्हणाले की, 'अपयशाला घाबरण्यापेक्षा त्यातून शिकून पुढे गेलं पाहिजे. भारत लवकरच मंगळ ग्रहावरही यशस्वी मोहीम राबवले असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
हेही वाचा : 7 कोटी PF धारकांसाठी आनंदाची बातमी! किती मिळणार व्याज? शेअर बाजाराचा होणार असा परिणाम
एएस किरण कुमार हे 2015 ते 2018 पर्यंत भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे प्रमुख होते. त्यांच्या नेतृत्वात भारताला अनेक ऐतिहासिक मोहिमेत यश मिळाले. त्यांच्या कार्यकाळात इस्रोने 144 उपग्रहांचे एकाच वेळी प्रक्षेपण केले. जो एक विक्रम होता. तसेच चंद्रयान-1 आणि मंगळयान मिशनमध्ये त्यांचं योगदान अतिशय महत्वपूर्ण होतं.
भारतीय अंतराळ संशोधन संस्थाचे माजी चेअरमन एएस किरण कुमार यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कार प्राप्त झाले असून यात 2014 मध्ये मिळालेला पद्मश्री, 2019 मध्ये फ्रांस सरकारकडून मिळालेला पुरस्कार, 2018 मध्ये मिळालेला वॉन कर्मन विंग पुरस्कार, 2006 मध्ये इसरो इंडिविजुअल पुरस्कार, 2008 मध्ये मिळालेला इसरो परफॉर्मेंस एक्सीलेंस अवार्ड इत्यादींचा समावेश आहे.