'अभिषेक मला मुळीच आवडत नाही...', म्हणणाऱ्या वादग्रस्त लेखिकेला अभिनेत्याचं सडेतोड उत्तर

Abhishek Bachchan नं त्या लेखिकेला सडतोड उत्तर दिल्यानंतर तिनं चक्क ट्वीट डिलीट करावं लागले आहे. दरम्यान, अभिषेकला या आधी देखील अनेक गोष्टींमुळे ट्रोल झाला आहे. 

Updated: Dec 24, 2022, 01:12 PM IST
'अभिषेक मला मुळीच आवडत नाही...', म्हणणाऱ्या वादग्रस्त लेखिकेला अभिनेत्याचं सडेतोड उत्तर title=

Writer Tasleema Nasreen Compared Amitabh Bachchan And Abhishek Bachchan : बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. अभिषेक बच्चन हा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतो. बऱ्याचवेळा सोशल मीडियावर नेटकरी अभिषेकला ट्रोल करतात. इतकंच काय तर काही नेटकरी अभिषेकची तुलना त्याचे वडील दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्याशी करतात. पुन्हा एकदा असाच काही प्रकार अभिषेकसोबत घडला आहे. मात्र, यावेळी अमिताभ आणि अभिषेक यांची तुलना ही लेखिका तस्लीमा नसरीन (Tasleema Nasreeen) यांनी केलं आहे. तस्लीमा यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्या दोघांची तुलना केली. त्यानंतर अभिषेकनं दिलेल्या उत्तरानं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. 

तस्लीमा यांनी त्यांच्यां ट्विटर अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्या म्हणाला, ‘अमिताभ बच्चनजी आपला मुलगा अभिषेक बच्चनवर प्रचंड प्रेम करतात. आपली सगळी प्रतीभा आपल्या मुलात ओतल्याचं आणि आपला मुलगा सर्वापेक्षा चांगला असल्याचं त्यांना वाटतं. अभिषेक चांगला आहेच. पण अभिषेक अमितजी इतका टॅलेंटेड आहे, असं मला मुळीच वाटत नाही.’ त्यांचे हे ट्वीट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले. हे ट्वीट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले. इतकेच काय तर यावर अभिषेकनं त्याच्या अंदाजात तस्लीम यांना उत्तर दिलं आहे.

Abhishek Bachchan Reaction On Author Tasleema Nasreeen Comparing Him With Father Amitabh Bachchan

 

तस्लीमा यांच्या या ट्वीटवर उत्तर देत अभिषेक म्हणाला, ‘मॅडम, तुम्ही अगदी खरं बोललात. कोणीच त्यांच्या प्रतीभेची वा अन्य गोष्टींची बरोबरी करू शकत नाही. ते सर्वश्रेष्ठ आहेत आणि कायम असतील. मी त्यांचा मुलगा आहे, याचा मला अभिमान आहे.’ अभिषेकनं उत्तर दिल्यानंतर मात्र, तस्लीमा यांनी त्यांचे ट्वीट डिलीट केले. 

हेही वाचा : 'देव करो तुम्हाला माझ्या मदतीची गरज भासणार नाही...', Covid येताच सोनू सूद अॅक्टिव्ह

दरम्यान, अभिषेक सगळ्यात शेवटी दसवी या चित्रपटात दिसला. तर नुकतीच त्याची टीम जयपूर पिंक पॅंथरनं प्रो कबड्डी लीग मध्ये विजय मिळवला आहे. आत्तापर्यंत प्रो कबड्डी लीगचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. एका व्हिडीओत अभिषेक हा ऐश्वर्या (Aishwarya Rai Bachchan) आणि आराध्यासोबत (Aaradhya) त्याची टीम जयपूर पिंक पॅन्थरची जर्सी परिधान केल्याचे दिसत आहे. अभिषेकची कबड्डी टीम 'जयपुर पिंक पॅंथर' (Jaipur Pink Panther) यांनी प्रो कबड्डी लीगच्या 9 व्या सीजनचा खिताब जिंकला आहे. त्याचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.