मुंबई : अभिनेत्री अमृता खानविलकरला आज कोण ओळखंत नाही. अमृता खानविलकरचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. तिच्या पर्सनल आयुष्यात काय चाललंय हे जाणून घेण्यासाठी तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडतं. सोशल मीडियावर चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री तिचे फोटो व्हिडिओ शेअर करत असते. नुकताच अभिनेत्रीने एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
खंरतर या व्हिडिओत अमृता भारुड म्हणताना दिसत आहे. 'मला दादला नको नी नवरा नको' हे भारुड म्हणताना दिसत आहे. खरंतर अमृताचा हा व्हिडिओ केवळ एक प्रमोशनल व्हिडिओ आहे. झी मराठीवरील उंच माझा झोका पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. झी मराठीने इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत झी मराठीने कॅप्शनमध्ये लिहीलंय की, अभिनेत्री अमृता खानविलकरचं अनोखं सादरीकरण...! 'उंच माझा झोका पुरस्कार २०२३' 27 ऑगस्ट, रविवार, 7 वाजता. पाहा याची एक झलक.
मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) ही लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. अमृताच्या अभिनयाचे आणि डान्सचे लाखो चाहते आहेत. अमृतानं तिच्या अभिनयाच्या जोरावर फक्त मराठी नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीतही स्वत:ची ओळख निर्माण केली. अमृतानं बॉलिवूडमधील अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केले. त्या यादीत 'सत्यमेव जयते', 'मलंग' आणि 'राझी' हे चित्रपट आहेत.
अमृता तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. काही दिवसांपुर्वी अमृताने आपल्याच नवऱ्याला म्हणजेच हिमांशूला सोशल मीडियावरून ब्लॉक केलं होतं. त्यामुळे त्यांच्यात सगळं आलबेल आहे की, नाही याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाला होता. 'पटलं तर घ्या विथ जयंती' या टॅाक शोमध्ये याबद्दलचा खुलासा खुद्द अमृताने केला होता. या गप्पाटप्पांमध्ये दिग्दर्शक ओम राऊतही सहभागी झाले होते. आणि यावेळी त्याने अमृता आणि त्याच्या नात्याचं सत्य सांगितलं आहे. ते दोघे एकमेकांचे 'बर्गर बडीज' असल्याचंही त्याने सांगितलं होतं. झी मराठीच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. लवकरच अमृता खानविलक झी मराठीच्या 'उंच माझा झोका २०२३’ या पुरस्कार सोहळ्यात भारुड म्हणताना दिसत आहे. तिचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.