Malaika Arora : बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल, मलायका अरोराच्या वडिलांनी बुधवारी मुंबईत आत्महत्या करत आयुष्य संपवलं. प्राथमिक माहितीनुसार मुंबईतील वांद्रे इथं असणाऱ्या इमारतीतून उडी घेऊन त्यांनी आयुष्य संपवलं. वांद्र्यातील अल्मेडा पार्क असं या इमारतीचं नाव सांगण्यात येत आहे. दरम्यान, मलायकाचे वडील अनिल मेहता यांनी हे टोकाचं पाऊल का उचललं यामागचं कारण अद्यापही अस्पष्ट असून, आता पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.
मलायका अरोरा आणि तिच्या कुटुंबाकडून सध्या सदर घटनेबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नसून, पोलिसांनी अभिनेत्रीच्या वडिलांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवल्याचं समजत आहे.
या घटनेची माहिती मिळाल्यानं संपूर्ण कलाविश्वाला हादरा बसला असून, सूत्रांच्या माहितीनुसार मलायकाचा Ex Husband अरबाज खान यानंही घटनास्थळी धाव घेतली. मलायकाला ज्यावेळी वडिलांच्या निधनाचं वृत्त सांगण्यात आलं तेव्हा ती मात्र पुण्यात होती, पण घटनेबद्दल समजताच तिनं तडक मुंबईची वाट धरली.
दरम्यान, 2023 मध्येच मलायकाच्या वडिलांना प्रकृती अस्वास्थ्यामुळं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यावेळी अभिनेत्रीची आई, जॉईस त्यांच्यासोबत दिसली होती. त्यांच्या आजारपणाचं नेमकं कारण मात्र त्यावेळी समोर आलं नव्हतं.
मलायकाच्या वडिलांनी आत्महत्या केल्याचं वृत्त समोर येताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तातडीनं तपास सुरू केला. पण कुठंही कोणत्याही प्रकारच पत्र सापडलं नाही. मागील काही दिवसांपासून आजारपणाशी झुंजणाऱ्या मलायकाच्या वडिलांनी घराच्या गॅलरीतून उडी मारत आयुष्य संपवलं. अभिनेत्रीच्या कुटुंबावर कोसळलेल्या दु:खाच्या डोंगरामुळं तिला आणि तिच्या कुटुंबीयांना आधार देण्यासाठी आता तिचा Ex Boyfroiend अर्जुन कपूर आणि इतरही कलाकार मंडळी पोहोचताना दिसत
आहेत.