मधुबालासारखी हुबेहूब दिसणारी अभिनेत्री; 'पवित्र रिश्ता' मालिकेत साकारली भूमिका

कलाविश्वात असे अनेक चेहरे आहेत, जे हुबेहूब एकमेकांच्या चेहऱ्यासोबत मिळतात.

Updated: Jun 7, 2021, 02:36 PM IST
मधुबालासारखी हुबेहूब दिसणारी अभिनेत्री;  'पवित्र रिश्ता' मालिकेत साकारली भूमिका  title=

मुंबई : कलाविश्वात असे अनेक चेहरे आहेत, जे हुबेहूब एकमेकांच्या चेहऱ्यासोबत मिळतात. बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री मधुबाला यांच्यासारखी दिसणारी एक अभिनेत्री सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. अनेक मुली आहेत ज्यांना मधुबाला यांच्या सारखं दिसायचं आहे. पण हुबेहूब मधुबाला यांच्यासारखं दिसण्याचा मान टिक टॉक स्टार प्रियंका कांडवालने मिळवला आहे. प्रियंकाला ओळख मिळाली तिच्या टिक टॉक व्हिडिओमुळे. तिचे व्हिडिओ तुफान व्हायरल देखील होवू लागले. 

भारतात टीक टॉक बॅन झालं असलं तरी प्रियंका इन्स्टाग्राम रिल्सवर आपल्या अंदाजांनी चाहत्यांना घायाळ करत असते. एवढंच नाही तर तिला मालिकांमध्ये काम करण्याची संधी देखील मिळाली. प्रियंका 'पवित्र रिश्ता' या मालिकेच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आली. त्यानंतर तिला अनेक मालिकांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. 

Madhubala Lookalike

प्रियंकाचा चेहरा पूर्णपणे मधुबाला यांच्या चेहऱ्याशी मिळता-जुळता आहे. तिची स्माईल  पाहून तर तुम्ही देखील चकित व्हाल. प्रियंका फार सुंदर आहे. ती फार स्टायलिश देखील आहे. ती हुबेहूब मधुबाला यांच्यासारखी दिसते असं म्हणायला काही हरकत नाही.