दिग्दर्शकासोबत अफेअर, तर 'या' पुरुषाशी लग्न करण्यासाठी लोकप्रिय अभिनेत्रीनं स्वीकारला इस्लाम

90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री जिला 'रंगीला गर्ल' म्हणून आपले एक विशेष स्थान निर्माण केले, तिच्या करिअरच्या सुरुवातीस अनेक वादग्रस्त गोष्टींना सामोरे जावे लागले. वयाच्या तिसऱ्या वर्षी बालकलाकार म्हणून पदार्पण करणारी ही अभिनेत्री नंतर मुख्य अभिनेत्री म्हणून चमकली आणि तिच्या सुंदरतेने आणि ग्लॅमरस इमेजने प्रेक्षकांना वेड लावले. पाहुयात कोण आहे ही अभिनेत्री?

Intern | Updated: Jan 25, 2025, 01:30 PM IST
दिग्दर्शकासोबत अफेअर, तर 'या' पुरुषाशी लग्न करण्यासाठी लोकप्रिय अभिनेत्रीनं स्वीकारला इस्लाम title=

या अभिनेत्रीने एकामागून एक हिट चित्रपट दिले, ज्यामध्ये 'सत्या', 'कौन', 'चायना गेट', आणि 'जुदाई' यांचा समावेश आहे. ती एक लोकप्रिय आणि यशस्वी अभिनेत्री बनली. पण फार कमी लोकांना माहित असेल की त्या काळात या अभिनेत्रीच्या एका प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शकासोबतच्या अफेअरची खूप चर्चा झाली होती. तो दिग्दर्शक तिच्याबद्दल इतका वेडा झाला की त्याने जवळपास 16 चित्रपट बनवले ज्यात ती मुख्य भूमिकेत होती. 

ही अभिनेत्री आहे उर्मिला मातोंडकर. या अभिनेत्रने त्या काळातील उत्कृष्ट चित्रपट केले, एका दिग्दर्शकामुळे तिने यशाचे शिखर गाठले परंतु त्याच दिग्दर्शकामुळे करिअरला उतरती कळा लागली. हा दिग्दर्शक होता राम गोपाल वर्मा, ज्याच्या चित्रपटांमध्ये उर्मिला नेहमी दिसत असे. असे म्हटले जातं की राम गोपाल वर्माला उर्मिलाचे खूप वेड लागले होते आणि त्यांच्या नात्यामुळे उर्मिलाची लोकप्रियता अजून वाढली. पण या नात्यामुळे वर्मांच्या वैयक्तिक जीवनात तणाव आला. त्याच्या पत्नी रत्नाने एकदा उर्मिलाच्या चित्रपट सेटवर जाऊन तिला कानशिलात मारली. ही घटना समोर आल्यानंतर राम गोपाल वर्माने पत्नीला घटस्फोट दिला, पण उर्मिलाच्या करिअरवर या घटनेचा गंभीर परिणाम झाला. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

या नात्यामुळे उर्मिला इतर निर्मात्यांपासून दूर होऊ लागली आणि तिची प्रतिमा देखील डागाळली. तिने राम गोपाल वर्मा यांच्या चित्रपटांमध्ये अधिक काम करू नये, असे इतर निर्मात्यांचे मत झाले. त्यानंतर उर्मिलाचे स्टारडम कमी होऊ लागले आणि ती दुसऱ्या लीड किंवा छोट्या भूमिकांमध्ये दिसू लागली. एके काळी हिट असलेली अभिनेत्री आता मात्र टीव्ही शोजकडे वळली.

नंतर 2016 मध्ये उर्मिलाने काश्मिरी व्यापारी मोहसिन अख्तर मीरशी लग्न केले, जो तिच्यापेक्षा 9 वर्षांनी लहान होता. या लग्नासाठी तिने आपला धर्म बदलला आणि हिंदू धर्मातून मुस्लिम धर्मात रूपांतरित होऊन आपले नाव 'मरियम अख्तर मीर' ठेवले. मोहसिन एक मॉडेल आणि अभिनेता होता, ज्याने 'लक बाय चान्स' चित्रपटात भूमिका केली होती. 

हे ही वाचा: सलमान खानचे आदर्श 'हे' दोन दिग्गज अभिनेते; म्हणाला, 'यांच्या प्रसिद्धीतील 10 टक्के ही माझ्याकडे नाही'

उर्मिला मातोंडकरने 2019 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि मुंबई उत्तरमधून लोकसभा निवडणूक लढवली. तिने आपल्या राजकीय कारकिर्दीला प्रारंभ केला, पण तिच्या आणि राम गोपाल वर्मा यांच्यातील नात्याबद्दल कधीही अधिकृत कबूलगीर दिली नाही. 

उर्मिला मातोंडकरचा प्रवास संघर्ष, अफेअर्स आणि जीवनातील बदलांमुळे असामान्य आणि प्रेरणादायक ठरला आहे. तिच्या करिअरच्या यशाचे, वादग्रस्त नात्याचे आणि आयुष्यातील मोठ्या निर्णयांचे दाखले तिच्या अद्वितीय प्रवासाचे साक्षीदार आहेत.