मुंबई : 6 वर्षांपूर्वी बॉलीवुड अभिनेत्री जिया खानने आत्महत्या केल्यानंतर अभिनेता सूरज पांचोलीवर आरोप लावण्यात आले होते. पण इतक्या वर्षांनंतर सूरज पांचोलीने याप्रकरणी फेसबुक पोस्ट लिहिली आहे. 6 वर्षापूर्वी अभिनेत्री जिया खानने आत्महत्या केली होती.त्यानंतर सापडलेल्या सुसाइड नोटवरून सुरज पांचोलीला आरोपी मानण्यात आलं. आता हे प्रकरण संपलय. सुरज पांचोलीच्या इंस्टाग्राम पोस्ट नंतर पुन्हा याप्रकरणाची चर्चा सुरू झालीयं.
'मी 6 वर्षांनी या विषयावर लिहितोय. कारण गेल्या 6 वर्षांपासून कोर्टात सुरू असलेली केस आता संपलीयं. मला समजत नाहीय सुरूवात कुठून करु. जर कोणत्या विषयात खूप साऱ्या भावना, खूप सारे जण सहभागी असतील तर त्याला शब्दात मांडण कठीण असतं. मी अशा सर्वांचे आभार मानतो जे माझ्या पाठिशी पर्वतासारखे उभे राहिले. गेली 6 वर्ष मी पूर्ण सन्मान आणि संयमाने ही केस लढलोयं. या केसची ट्रायल संपण्याची वाट पाहतोयं.
या दरम्यान माझ्यावर मर्डर आणि गुन्हेगाराचे आरोप झाले. मला खोट ठरवण्यात आलं.
अनेकजण माझ्या विरोधात गेले. मी माझ्याबद्दल कोणती बातमी वाचली की बऱ्याचदा त्याकडे दुर्लक्ष करायचो. पण माझ्याशी जोडल्या गेलेल्यांना या गोष्टी अजिबात आवडायच्या नाहीत.
त्यांना फार दु:ख व्हायचं. त्यांच्यासमोर माझी प्रतिमा मलिन झाल्याबद्दल मी लोकांना दोषी ठरवू इच्छित नाही.'
'मी कोणी सैतान नाहीयं. कोणाबद्दलही इतकं वाईट बोलणं सोपं असतं. पण या सर्वात स्वत:ला निर्दोष सिद्ध करणं खूप कठीण असतं.
जेव्हा तुम्हाला स्वत: निर्दोष सिद्ध करायचं असतं तेव्हा एका प्रक्रियेतून जावं लागतं. जेवढं मला आठवतंय मी नेहमी हेच स्वप्न बघतो की माझ्या आईवडीलांचं नाव उज्वल व्हावं.
मी गेली 6 वर्षे याचसाठी खूप मेहनत घेतोयं.' असं तो म्हणतो.