$ 64,820,000,000,000 : भारतातून पळ काढताना किती पैसा लुटून गेले इंग्रज? अख्खं लंडन चार वेळा झाकलं जाईल एवढा!

History News : भारतावर ब्रिटीशांनी कशा पद्धतीनं राज्य केलं, ब्रिटीश शासनकाळात भारतीयांवर कशा पद्धतीनं अत्याचार करण्यात आले इथपासून स्वातंत्र्यासाठीच्या लढ्यापर्यंतच्या कैक गोष्टी आजवर ऐकायला मिळाल्या....   

सायली पाटील | Updated: Jan 20, 2025, 03:03 PM IST
$ 64,820,000,000,000 : भारतातून पळ काढताना किती पैसा लुटून गेले इंग्रज? अख्खं लंडन चार वेळा झाकलं जाईल एवढा! title=
history How much money did the British looted from India

History News : 'सोने की चिडीया' अशी ओळख असणाऱ्या भारत भूमीवर जवळपास 150 वर्षे परकियांनी अर्थात ब्रिटीशांनी राज्य केलं. कैक वर्षे देशावर अधिपत्य गाजवणाऱ्या याच ब्रिटीशांनी देशातील सामान्यांना वेठीस धरलं, त्यांच्यावर अत्याचार केले, इतकंच काय तर त्यांनी गुरांप्रमाणे वागवलं आणि राबवलंसुद्धा. अखेर स्वातंत्र्यलढ्याच्या तलवारीची धार आणखी वाढली आणि सरतेशेवटी भारतीयांच्या जिद्दीपुढं, त्यांनी दिलेल्या लढ्यापुढं ब्रिटीशराजही माघार घेत देशातून हद्दपार झालं. 

इंग्रज भारतातून गेले खरे, पण दरम्यानच्या वर्षांमध्ये त्यांनी भारताची मोठी लूट केली. ऑक्सफॅन इंटरनॅशनल रिपोर्टमधून याचसंदर्भातील संपूर्ण माहिती अखेर प्रसिद्ध करण्यात आली असून, ब्रिटीशांनी भारतातून अब्जावधींची संपत्ती आपल्यासोबत नेली. 

$64,820,000,000,000... म्हणजे रुपयांमध्ये किती? 

अहवालातून समोर आलेल्या माहितीनुसार ब्रिटननं भारतावर राज्य केल्यानंतर इथून जितक्या संपत्तीची लूट केली तिचा आकडा प्रचंड मोठा होता. 1765 ते 1900 दरम्यानच्या काळात ब्रिटननं भारतातून एकूण 64.82 ट्रिलियन अमेरिकी डॉलर इतकी संपत्ती आपल्या देशी नेली. फक्त भारतच नव्हे, तर इतरही अनेक देशांमध्ये वसाहती स्थापन करत पुढे याच देशांना गुलामगिरीच्या विळख्यात ओढत तिथूनही ब्रिटीशांनी अशीच संपत्ती लुटली. 

हेसुद्धा वाचा : लोकांच्या घरात धुणी-भांडी करणाऱ्या महिलेचा लेक दुसऱ्यांदा सर्वात बलाढ्य देशाचा राष्ट्राध्यक्ष! 

अधिकृत माहितीनुसार भारतातून लुटलेल्या सर्वाधिक रकमेचा एक मोठा भाग ब्रिटनच्या 10 टक्के श्रीमंतांकडे गेला. ही रक्कम होती जवळपास 33.8 ट्रिलियन डॉलर. ही रक्कम इतकी मोठी आहे, की ती 50 ब्रिटीश पाऊंडच्या हिशोबानं मोजली जाईल, तर एकटं लंडन शहर 4 वेळा फक्त आणि फक्त नोटांच्या ढिगानं झाकलं जाईल. ऑक्सफॅमच्या वार्षिक अहवालानुसार वसाहतीकरणामुळं एका असमान जगाचा पाया पडला, जिथं श्रीमंत कायमच श्रीमंत राहिले आणि गरीब देशातील धनाचा संपूर्ण ओघ हा याच श्रीमंत राष्ट्र आणि श्रीमंत समाजाकडे वाहत राहिला. या अतिशय महत्त्वपूर्ण अशा अहवालाला  'टेकर्स, नॉट मेकर्स' अशा शीर्षकासह प्रसिदग्ध करण्यात आलं आहे. 

...म्हणून भारतात उद्योग मागे पडले 

1750 मध्ये जागतिक औद्योगिक क्षेत्रात भारताचं योगदान 25 टक्के इतकं होतं. पण, 1900 वर्षापर्यंत हा आकडा घसरून 2 टक्क्यांवर पोहोचला. यास महत्त्वाचं कारण ठरला तो म्हणदे वसादहतवाद आणि ब्रिटनकडून भारतात केली गेलेली लूट. संसाधनं आणि आर्थिक पाठबळाअभावी भारतातील औद्योगिक क्षेत्राला मोठा धक्का बसला आणि देश पिछाडीवर गेला.