मुंबई : बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानो यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. श्वासोच्छवासाच्या समस्या, उच्च रक्तदाब आणि उच्च शुगरमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सायरा बानो अजूनही आयसीयूमध्ये दाखल आहेत. सायरा बानो यांच्या काही चाचण्या झाल्या आहेत ज्यात त्यांना हृदयाशी संबंधित समस्यांबद्दल माहिती मिळाली आहे. डॉक्टरांना सायरा बानो यांची अँजिओग्राफी करायची आहे पण त्यांनी ते करण्यास नकार दिला आहे.
डॉक्टरांना करायची आहे अँजिओग्राफी
एका वृत्तानुसार, हिंदुजा हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सायरा बानो यांना अँजिओग्राफी करण्याचा सल्ला दिला आहे. अहवालांवर विश्वास ठेवायचा झाला तर त्यांनी हे करण्यास नकार दिला आहे. डॉक्टरांनी त्याला अँजिओग्राफ प्रक्रिया करण्याचा सल्ला दिला आहे जेणेकरून त्यांना सायरा यांच्या हृदयाची स्थिती समजेल. अहवालानुसार, आदल्या दिवशी जेव्हा सायरा बानो यांचं हार्ट चेकअप करण्यात आलं होतं, तेव्हा ती 'एक्युट कोरोनरी सिंड्रोम'ने ग्रस्त असल्याचं आढळून आलं आहे.
डिप्रेशनशी लढत आहे
सायरा बानो यांच्याकडे उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी सांगितलं की, दिलीप कुमार यांच्या मृत्यूनंतर त्या नैराश्याशी झुंज देत आहे. त्यांना जास्त झोप येत नाही आणि त्यांना घरी जायचं आहे. रिपोर्ट्सनुसार सायरा बानो अजूनही आयसीयूमध्ये आहेत. डॉक्टर त्यांना लवकरच जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करु शकतात. अहवालांनुसार, अभिनेत्रीचं कुटुंबीय त्यांच्या अँजिओग्राफीसंदर्भात निर्णय घेतील. अहवालानुसार, कुटुंब म्हणतं आहे की, आम्हाला घाई नाही. ते 4-5 दिवसात निर्णय घेतील.
अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत फैजल फारुकी यांनी सांगितलं आहे की, दिलीप कुमार यांच्या मृत्यूनंतर सायरा बानो खूपच तुटल्या आहेत. त्या 55 वर्षांपासून प्रत्येक क्षणी दिलीप कुमारसोबत होत्या. यावर्षी जुलै महिन्यात दिलीप कुमार यांनी या जगाचा निरोप घेतला. ते 98 वर्षांचे होते. बऱ्याच दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती.