घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान ऐश्वर्याचं महिलांवरील हिंसाचारावर वक्तव्य, व्हायरल होतोय VIDEO

Aishwarya Rai Bachchan VIideo : घटस्फोटाच्या चर्चांमध्ये ऐश्वर्या रायनं शेअर केलेल्या त्या व्हिडीओची एकच चर्चा...

दिक्षा पाटील | Updated: Nov 26, 2024, 04:21 PM IST
घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान ऐश्वर्याचं महिलांवरील हिंसाचारावर वक्तव्य, व्हायरल होतोय VIDEO title=
(Photo Credit : Social Media)

Aishwarya Rai Bachchan VIideo : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन ही गेल्या बऱ्याच काळापासून पती अभिषेक आणि बच्चन कुटुंबापासून दूर राहते. त्यांच्या घटस्फोटाच्या अफवांना घेऊन ऐश्वर्या आणि अभिषेक दोघेही चर्चेत आहेत. काही वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर 2007 मध्ये त्या दोघांनी सप्तपदी घेतल्या. या दोघांची जोडी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय सेलिब्रिटी कपल्सपैकी एक आहे. या सगळ्यात त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी सगळ्यांचं लक्ष वेधलं. त्यात आता ऐश्वर्यानं एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ऐश्वर्या महिलां विरोधात होणाऱ्या हिंसाचारावर बोलताना दिसते. 

ऐश्वर्या किंवा अभिषेकनं त्यांच्या घटस्फोटाच्या अफवांवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यात ऐश्वर्याचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय. ऐश्वर्यानं तिच्या इन्स्टाग्राम अकांऊटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ऐश्वर्या राय स्वत: महिलांवर होणाऱ्या हिंसाचारावर बोलताना दिसते. एका मोहिमेविषयी सांगते आणि त्यासोबत चाहत्यांना देखील या मोहिमेचा भाग होण्यास सांगत आहे. महिलांविरोधात होणारा हिंसाचारा विरोधात बोलण्यास ती सांगत आहे. या व्हिडीओला शेअर करत ऐश्वर्या रायनं कॅप्शन दिलं की महिलांविरोधी हिंसाचार संपवायचा असेल तर आंतरराष्ट्रीय दिवसा निमित्तानं लॉरियल पॅरिस यावेळी महिलांविरोधात होणाऱ्या हिंसाचाराला थांबवण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रमात भाग होणार आहे. हा निर्णय महिलांच्या सन्मानासाठी आणि सुरक्षेसाठी घेण्यात आला आहे. महिलांना त्यांना जिथे सन्मान मिळेल अशा ठिकाणी राहण्याचा हक्क आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

दरम्यान, ऐश्वर्यानं शेअर केलेल्या या व्हिडीओवर तिच्या चाहत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तिनं केलेल्या या प्रयत्नाचं कौतूक केलं आहे आणि त्यासोबतचं तिला पाठिंबा देणार असल्याचे म्हटले आहे. जर ऐश्वर्या रायच्या कामाविषयी बोलायचं झालं तर सगळ्यात शेवटी ती मणिरत्नम यांच्या 'पोन्नियिन सेल्वन 2' मध्ये दिसली होती. चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्याशिवाय ऐश्वर्या नेहमीच तिची लेक आराध्यासोबत वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये दिसते. घटस्फोटाच्या अफवांमध्ये आराध्या ही सतत ऐश्वर्यासोबतच दिसते.