मुंबईः रणबीर-आलियाचा विवाहसोहळा काही दिवसांपूर्वी पार पडला...पाली हिलमधील 'वास्तू' बंगल्यात हा शाही विवाह सोहळा पार पडला. लग्नातील त्यांच्या प्रत्येक लूकची जोरदार चर्चा झाली.
तसंच पोस्ट वेडिंग लूकनेही त्यांच्या चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं..लग्नानंतर पहिल्यांदाच बाहेर पडलेल्या पिंक ड्रेसमधील आलियाचा सोज्वळ लूक सर्वांनाच भावला होता.
मात्र आता आलियाचा शॉर्ट्समधला बोल्ड लूकही तितकाच पसंतीस पडतोय..शॉर्ट्सवर व्हाईट शर्ट आणि डोळ्यांवर ब्लॅक गॉगल असा स्टनिंग लूक खूपच सुंदर दिसत आहे.
कपूर घराण्याची सून बनल्यानंतर आलियाचे कपडे आणखीच छोटे होत चालले आहेत असं तिच्या चाहत्यांचं म्हणणं आहे. तसंच आलियाला पाहिल्यानंतर नुकतंच तिचं लग्न झालंय असं वाटतच नाही अशा कमेंट्स चाहते करत आहेत.
'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या सिनेमाच्या शूटिंग आलिया रवाना झाली तेव्हा तिचा हा लूक कॅमेऱ्यात कैद झाला. मनीष मल्होत्रा व करण जोहरसोबत ‘रॉकी और रानी की प्रेमकहानी’च्या शूटींगसाठी काही दिवस जेसलमेर येथे आलियाचा मुक्काम राहणार आहे.
या चित्रपटात रणवीर सिंग, धर्मेन्द्र, शबाना आझमी, जया बच्चन लीड रोलमध्ये आहेत. अद्याप या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर झालेली नाही.
आलिया आणि रणबीर हे दोघेही लग्नानंतर लगेचच त्यांच्या कामावर परतले आहेत. 14 एप्रिलला आलियाने रणबीर कपूरसोबत लग्नगाठ बांधली आणि लग्नाच्या पाचव्याच दिवशी कामावर परतली.