'विमानात केली मारहाण, मुलाचाही दाबला गळा...,' 'या' प्रसिद्ध अभिनेत्याच्या पत्नीनं केले धक्कादायक आरोप

हे सेलिब्रिटी कपल पुन्हा एकदा एका नव्या वादामुळे चर्चेत आलं आहे. 

Updated: Oct 5, 2022, 05:48 PM IST
'विमानात केली मारहाण, मुलाचाही दाबला गळा...,' 'या' प्रसिद्ध अभिनेत्याच्या पत्नीनं केले धक्कादायक आरोप title=

मुंबई : हॉलिवूडची प्रसिद्ध एक्स-कपल अँजेलिना जोली (Angelina Jolie)  आणि ब्रॅड पिट (Brad Pitt)  यांच्यातील भांडण संपण्याचे नाव घेत नाहीये. अँजेलिना जोलीने तिच्या पूर्वाश्रमीचा पती विरुद्ध $250 दशलक्ष  म्हणजे सुमारे 2 हजार कोटींचा खटला दाखल केला आहे. हे संपूर्ण प्रकरण फ्रेंच वाइनरीच्या कायदेशीर लढाईचे आहे, जी या जोडप्याने 2008 मध्ये विकत घेतली होती. आता या प्रकरणात अँजेलिनाने 2016 च्या वादग्रस्त विमान प्रवासाबाबत ब्रॅड पिटवर खळबळजनक आरोप केले आहेत. त्या फ्लाइटमध्ये ब्रॅड पिट खूप रागावला होता, असा दावा अँजेलिनाने केला आहे. त्याने आपल्या सहा मुलांना बेदम मारहाण केली होती. मुलाचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. एवढेच नाही तर ब्रॅड पिटने एका मुलाच्या तोंडावर मारले आणि अभिनेत्रीसोबत हिंसाचारही केला, असा दावा अँजेलिनाने केला आहे.

आणखी वाचा : 'बुरखा, हिजाब, लव्ह जिहाद...', रिचा चढ्ढा आणि अली फजलच्या लग्नानंतर नेटकऱ्यांनी दिल्या विचित्री शुभेच्छा!

अँजेलिना जोली आणि ब्रॅड पिट 2016 मध्ये विभक्त झाले. ब्रॅड पिटचा फ्रेंच वाईनरी प्रकरणात आपला हिस्सा विकण्यास सहमत नव्हता, म्हणून त्याने अँजेलिनावर खटला दाखल केला. याला प्रत्युत्तर म्हणून अभिनेत्रीनेही ब्रॅडवर दावा ठोकला आहे. जुलैमध्ये अँजेलिनाने हा खटला जिंकल्यानंतर आता हा नवा खटला दाखल केला आहे. (Angelina Jolie Claims Brad Pitt Choked And Hit His Kids On Flight Actor Responds As Fake Allegations In French Winery Case) 

आणखी वाचा : एक दोन नाही तर, 17 मिनिटं चालला राम कपूर- साक्षी तंवर यांचा इंटीमेट सीन, प्रेक्षकांकडून संताप व्यक्त

अँजेलिनाने ब्रॅड पिटपासून घटस्फोट का घेतला हे सांगितलं
तिच्या प्रतिवादामध्ये अँजेलिनाने ब्रॅड पिटपासून विभक्त का झाले हे उघड केलं आहे. CNN च्या रिपोर्टनुसार, अँजेलिनाने न्यायालयात कागदपत्रे सादर केलेत, ज्या 2016 मध्ये त्या दिवशी विमानतळावर येण्यापूर्वी ब्रॅड पिटचा तिच्या सहा मुलांपैकी एकाशी वाद झाला होता. त्यावेळी सर्व मुले 8 ते 15 वयोगटातील होती. अँजेलिनानं म्हटले की, 'कुटुंब विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच ब्रॅड पिटचे संतापजनक वागणे सुरू झाले. त्याचा एका मुलाशी वाद झाला. जेव्हा आम्ही फ्लाइटवर गेलो, तेव्हा मी त्याला विचारले की काय झाले, ज्यावर ब्रॅड पिट म्हणाला, 'मी मुलांची बाजू खूप घेते.' त्यानंतर त्याने मला फ्लाइटच्या टॉयलेटमध्ये ओढले. तिथे त्याने माझे डोके धरले आणि माझे डोके हलवले, माझे खांदे घट्ट पकडले आणि मग मला बाथरूमच्या भिंतीवर ढकलले.

आणखी वाचा : राजू श्रीवास्तव यांच्या शोक सभेत आलेल्या विनोदवीराचं निधन

'ब्रॅड पिटने गळा दाबून, तोंडावर मारले'
अँजेलिना पुढे म्हणाली की 'ब्रॅड पिटने फ्लाइटमध्ये आपल्या मुलावर हल्ला केला. जेव्हा अँजेलिनाने मागून पकडत त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यानं अभिनेत्रीला मागे ढकलले आणि सीटच्या दिशेने फेकले, ज्यामुळे अँजेलिनाच्या पाठीला आणि कोपराला दुखापत झाली. हा सगळा प्रकार सुरू असताना पलीकडे बसलेली मुलेही धावत धावत तेथे पोहोचली. मुलांनी धैर्याने एकमेकांचे रक्षण करण्याचा प्रयत्न केला. पण ब्रॅडनं एका मुलाला पकडून त्याचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला आणि दुसऱ्याच्या तोंडावर मारला.

आणखी वाचा : 'या' राशीच्या लोकांचा Sixth Sense असतो आश्चर्यकारक, त्यांना आधीच कळतात सगळ्या गोष्टी

अँजेलिना खोटे बोलत आहे- ब्रॅड पिट 
ब्रॅडनेही अँजेलिनाच्या दाव्यांवर प्रतिक्रिया दिली आहे. 'अँजेलिनाची कहाणी प्रत्येक वेळी नवीन आणि निराधार दावे घेऊन येते,  हे सर्व आरोप खोटे आहेत, असे ब्रॅड म्हणाला. 

आणखी वाचा : 'मतलब कुछ भी...' सोनू सूद रेल्वे स्टेशनवरील पाण्याला सुपर हेल्दी म्हटल्यामुळे झाला ट्रोल

दरम्यान, 2016 मध्ये जेव्हा ही घटना फ्लाइटमध्ये घडली. त्यानंतर एफबीआयलाही यात हस्तक्षेप करावा लागला. त्यानंतर अँजेलिनाने ब्रॅड पिटवर कोणतीही कारवाई न करण्याचे ठरवले. त्यानंतर इन-कॅमेरा सुनावणीनंतर न्यायालयाने ब्रॅड पिट आणि अँजेलिना जोली यांना 50-50 मुलांचा ताबा दिला. मात्र, फ्रेंच वाईनरी प्रकरणाने ही घटना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ब्रॅड आणि अँजेलिना जवळपास 10 वर्षे लिव्ह-इन पार्टनर होते. यानंतर 2014 मध्ये दोघांनी लग्न केलं. पण 2016 मध्येच अँजेलिनानं घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. 2019 मध्ये दोघेही विभक्त झाले. मात्र, मुलांचा ताबा आणि पैशांचे वाटप असे मुद्दे अजूनही वादातीत आहेत. याबाबत न्यायालयाचा निर्णय आलेला नाही.