Ankita Lokhande Father Death : पवित्र रिश्ता फेम आणि बॉलिवूड अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) कायम चर्चेत असते. चार दिवसांपूर्वी अंकिताने सोशल मीडियावर पुन्हा लग्न केल्याचा एक व्हिडीओ तिने शेअर केला होता. लग्नाचा वाढदिवस साजरा करताना तिने पुन्ही एका पती विकी जैन सोबत ख्रिश्चन पद्धतीने लग्न केलं. मात्र आज तिच्यावर डोक्यावरील मायाची सावली हरपली आहे. अंकिता लोखंडे हिच्या वडिलांचं निधन मुंबई झाल्यामुळे अभिनेत्री कोलमडली आहे. (ankita lokhande father passed away in mumbai latest news today)
क्षणा आनंद आणि क्षणात... दुःख आयुष्यात पुढच्या पाऊलावर काय लिहिलं आहे कोणालाही माहिती नसतं. अंकिताच्या वडील काही दिवसांपासून आजारी होते. त्यांनी शेवटचा श्वास घेतला तेव्हा ते 68 वर्षांचे होते. ओशिवरा इथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. लेकीने वडिलांच्या पार्थिवाला खांदा देऊन अखेरचा निरोप दिला.
अंकिता लोखंडे सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिने तिच्या अकाऊंटवर अनेक वेळा वडिलांसोबत नेहमी फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहे. काहीच दिवसांपूर्वी फादर्स डेच्या निमित्ताने अभिनेत्रीने तिच्या वडिलांसोबतचा एक भावनिक व्हिडीओ शेअर केला होता.
अंकिताचे कुटुंब हे मुळचे इंदूरचे असून तिचे वडील शशिकांत लोखंडे हे बँकर होते आणि आई वंदना या शिक्षिका होत्या.
मायेचं छत्र हरपल्यामुळे अंकिता पूर्णपणे कोलमडली असून रडून रडून ती बेहाल झाली आहे.
कुटुंबातील सदस्य तिला सांभाळण्याचा प्रयत्न करत आहेत.