अंकिता लोखंडेने बॉयफ्रेंडचे पाय धरून घेतले आशीर्वाद; पण का?

अंकिताचा 'हा' व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल      

Updated: Mar 30, 2021, 07:19 AM IST
अंकिता लोखंडेने बॉयफ्रेंडचे पाय धरून घेतले आशीर्वाद; पण का? title=

मुंबई : अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) सध्या तुफान चर्चेत आली आहे. अंकिता कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ  पोस्ट करत असते. आता देखील तिने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये अंकिता तिच्या बॉयफ्रेंड विकी जैनचे पाय धरून आशीर्वाद घेताना दिसत आहे. अंकिताचा हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. होळीच्या मुहूर्तावर अंकिताने हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita)

अंकिताने व्हिडिओ पोस्ट करत सर्वांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अंकिता कायम सोशल मीडियावर बॉयफ्रेंडसोबत फोटो शेअर करत असते. सुशांतसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अंकिता उद्योगपती विकी जैनला डेट करत आहे. अंकिता-विकी लवकरच लग्न करणार असल्याच्या चर्चा रंगत आहे. त्यामुळे ते कधी विवाह बंधनात अडकतात याकडे सर्वांचं लक्ष आहे. 

सुशांत आणि अंकिता यांच्यातील मैत्री 'पवित्र रिश्ता' मालिकेच्या माध्यमातून झाली. त्यानंतर त्यांच्या मैत्रीचं रूपांतर  प्रेमात झालं. पण त्यांचं नातं फार काळ काही टिकू शकलं नाही. त्यांचं ब्रेकअप झाल्यानंतर त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. पण आता अंकिताने सर्व  काही विसरून तिच्या नव्या प्रावासाला सुरूवात केली.