'ही तुमच्या प्रार्थनांची... ', मलायकासोबतच्या ब्रेकअपच्या अफवांदरम्यान अर्जुन कपूरची क्रिप्टिक पोस्ट

Arjun Kapoor Cryptic Post :  अर्जुन कपूरनं मलायकासोबतच्या ब्रेकअपच्या चर्चांमध्ये शेअर केली क्रिप्टिक पोस्ट

दिक्षा पाटील | Updated: Oct 4, 2024, 11:38 AM IST
'ही तुमच्या प्रार्थनांची... ', मलायकासोबतच्या ब्रेकअपच्या अफवांदरम्यान अर्जुन कपूरची क्रिप्टिक पोस्ट title=
(Photo Credit : Social Media)

Arjun Kapoor Cryptic Post : बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर आणि मलायका अरोराच्या ब्रेकअपच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहेत. खरंतर त्या दोघांनी या प्रकरणात वक्तव्य केलेलं नाही. तर काही दिवसांपूर्वी मलायकाचे वडील अनिल मेहताचं निधन झालं. त्यानंतर मलायका कुटुंबासोबत होती तर तिची साथ देण्यासाठी तिला पाठिंबा देण्यासाठी अर्जुन संपूर्णवेळ तिच्यासोबत होता. ज्यानंतर त्या दोघांच्या चाहत्यांना आणि नेटकऱ्यांना त्याच्या रिलेशनशिप स्टेटसविषयी जाणून घ्यायचे होते. 

अर्जुन कपूर आणि मलायका अरोराच्या ब्रेकअपच्या चर्चांवर त्यांनी अजूनही मौन साधलेलं आहे. पण सोशल मीडियावर त्यांच्या आयुष्याशी संबंधीत पोस्ट शेअर करताना दिसतात. आता पुन्हा एकदा अर्जुननं सोशल मीडियावर एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांचा घटस्फोट झाला का याकडे सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. अर्जुन कपूरनं त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरून एक पोस्ट शेअर केली आहे. ज्याच लिहिलं आहे की तुमच्याकडे आहे, त्यासाठी मी आभारी राहा. कारण कधी या सगळ्या गोष्टी मिळाव्या यासाठी तुम्ही प्रार्थना केली होती आणि त्या प्रार्थनांची ती उत्तर होती. 

arjun kapoor shares cryptic post after breakup news with malaika arora says it was once the answer

दोघांच्या या गुंतागुंतीच्या नात्यात अर्जुननं शेअर केलेल्या या पोस्टवर आता पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. आता या पोस्टवरून लोक दोन वेगवेगळ्या चर्चा करत आहेत. लोकांचं म्हणणं आहे की जर मलायकासोबत नातं संपलं आहे तर ते लोक एकमेकांना विसरले आहेत. कारण जेव्हा मलायकावर दुखांचा डोंगर कोसळला होता तेव्हा अर्जुन कपूर तिच्यासोबत उपस्थित होता. काही लोकांचं म्हणणं आहे की तो त्यांच्या नात्यानंतर हे सांगत आहेत. 

अर्जुन आणि मलायकाच्या ब्रेकअपची अफवा सुरु झाल्या जेव्हा ती अर्जुन कपूरच्या वाढदिवसाच्या पार्टीत सहभागी झाली नव्हती, इतकंच नाही तर तिनं पोस्ट देखील शेअर केली नव्हती. त्यानंतर बातमी समोर आली की मलायका कोणत्या मिस्ट्री मॅनसोबत सुट्ट्यांचा आनंद घेत आहे अशा बातम्या समोर आल्या होत्या. या कार्यक्रमात अर्जुन आणि मलायका दोघं उपस्थित होते. पण त्या दोघांनी एकमेकांकडे पाहिलं देखील नाही. 

हेही वाचा : 'टवाळखोर', जेव्हा शाहरुखनं आमिरवर साधला होता निशाणा; 'त्या' व्हिडीओमुळे SRK ट्रोल

अर्जुनच्या कामाविषयी बोलायचं झालं तर तो लवकरच रोहित शेट्टीच्या ‘सिंघम अगेन’ मध्ये दिसणार आहे. लक्षवेधी गोष्ट म्हणजे अर्जुन कपूर हा या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसत आहे. अर्जुन कपूरनं त्याच्या लूकचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. तेव्हापासून रोहित शेट्टीच्या या आगामी चित्रपटात अर्जुन कपूरला पाहण्यासाठी प्रेक्षक फार उत्सुक आहेत.