'मी हार नाही मानणार' Irrfan Khan च्या आठवणीत भावूक झाला Babil, पोस्ट वाचून डोळे पाणावतील

Irrfan Khan Death Anniversary : बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत अभिनयात आपली क्षमता सिद्ध करणारा ज्येष्ठ अभिनेते इरफान खान यांनी 29 एप्रिल 2020 जगाचा निरोप घेतला. वडिलांच्या आठवणीत मुलगा बाबिल खान भावूक होऊन त्यांने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केलंय. 

नेहा चौधरी | Updated: Apr 29, 2024, 08:11 AM IST
'मी हार नाही मानणार' Irrfan Khan च्या आठवणीत भावूक झाला Babil, पोस्ट वाचून डोळे पाणावतील title=
Babil Khan Emotional Post on Instagram Irrfan Khan Death Anniversary

Babil Khan Emotional Post : कुठलीही भूमिका असो त्यात प्राण फुंकणारा अभिनेता म्हणजे इरफान खान. त्याच्या चित्रपटामुळे तो आजही चाहत्यांच्या मनात आहे. चार वर्षांपूर्वी 29 एप्रिल 2020 त्याने अखेरचा श्वास घेतला. अशात इरफान खानच्या मुलगा बाबिलने रविवारीच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये तो वडिलांच्या आठवणीत भावूक झालेला दिसला. त्याची ही हृदयस्पर्शी पोस्ट अनेकांच्या डोळ्यात पाणी आणत आहे. (Babil Khan Emotional Post on Instagram Irrfan Khan Death Anniversary )

कोलन इन्फेक्शनमुळे अभिनेता इरफान खानचं मुंबईत निधन झालं. इरफानच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबात पत्नी सुतापा सिकदर आणि दोन मुलं अयान आणि बाबिल खान आहेत. इन्स्टाग्रामवर पोस्ट करताना बाबिल म्हणाला की, त्याच्या वडिलांनी त्याला 'योद्धा' व्हायला शिकवलंय आणि 'तो हार मानणार नाही.' 

हृदयस्पर्शी पोस्ट व्हायरल 

या पोस्टसोबत त्याने इरफान खानचे काही फोटो शेअर केले आहे. त्यासोबत कॅप्शनमध्ये त्याने वडिलांना वचन दिलंय की, तो कुटुंबाची काळजी घेईल. तू मला योद्धा व्हायला शिकवलंस, पण प्रेम आणि दयाळूपणाने जोडायलाही शिकवलंस. तू मला आशा शिकवलीस आणि लोकांसाठी लढायला शिकवलंस. तुमचं चाहते हे तुमचं कुटुंब आहे आणि मी तुम्हाला वचन देतो बाबा, जोपर्यंत तुम्ही मला बोलावत नाही तोपर्यंत मी माझ्या लोकांसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी लढेन. मी हार मानणार नाही. मी तुला खूप प्रेम करतो.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Babil (@babil.i.k)

काही दिवसांपूर्वी धक्कादायक पोस्ट!

बाबिलने काही दिवसांपूर्वी एक धक्कादायक पोस्ट केली होती. ज्यामध्ये त्याने बाबांकडे जाण्यासारखं वाटतंय असं लिहिलं होतं. ही पोस्ट पाहून सगळ्यांना धक्का बसला होता. चाहतेही ही पोस्ट पाहून घाबरले होते. मात्र काही वेळाने बाबिलने ही पोस्ट डिलीट केली होती.