तृप्ती देसाईंनाही Pushpa च्या 'श्रीवल्ली'चं याड लागलं... डान्स Video Viral

या चित्रपटानं अशी काही जादू केलीये की ती शब्दांत मांडणं कठीणच

Updated: Jan 24, 2022, 12:44 PM IST
तृप्ती देसाईंनाही Pushpa च्या 'श्रीवल्ली'चं याड लागलं... डान्स Video Viral
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : (Pushpa: The rise)'पुष्पा' या चित्रपटाचं भलतंच वेड सध्या अनेकांमध्ये पाहायला मिळत आहे. खेळाडू म्हणू नका किंवा मग राजकीय नेते मंडळी, या चित्रपटानं अशी काही जादू केलीये की ती शब्दांत मांडणं कठीणच. 

पुष्पाच्या स्टाईलपासून चित्रपटातील गाण्यांच्या प्रत्येक स्टेपपर्यंत सारंकाही आता ट्रेंड होऊ लागलं आहे. 

आता ट्रेंड आहेच, तर चला की.... आपणही तो फॉलो करु असं म्हणत सामाजिक कार्यकर्त्या आणि बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वामुळं चर्चेत आलेल्या तृप्ती देसाई यांचंही वेगळं रुप इथं पाहायला मिळालं. 

अल्लू अर्जुनची मध्यवर्ती भूमिका असणाऱ्या या चित्रपटातील 'श्रीवल्ली' या गाण्यावर देसाई यांनीही ठेका धरला. 

खास डान्सिंग पार्टनरसह यावेळी त्यांनी सर्वांच्याच नजरा वळवल्या. 

मुळात आपल्या ठाम भूमिकांसाठी कायमच गंभीर रुपात दिसणाऱ्या देसाई यांचा हा लूक सर्वांनाच थक्क करणारा होता. 

याच कारणानं म्हणून त्यांचा श्रीवल्ली डान्सचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होऊ लागला आहे. 

'श्रीवल्ली डान्स ... मी आणि माझी नणंद सीमा पाटील... असंच काहीतरी', असं कॅप्शन देत त्यांनी हा व्हिडीओ शेअर केला. 

व्हिडीओ पाहून, खऱ्या अर्थानं पुष्पाची जादू देसाई यांच्यावरही चालली असं म्हणणं वावगं ठरणार नाही.