दीपिकाची TikTok वर धमाकेदार एन्ट्री; व्हिडिओ व्हायरल

दीपिकाचा टिक टॉक डेब्यू

Updated: Jan 6, 2020, 02:56 PM IST
दीपिकाची TikTok वर धमाकेदार एन्ट्री; व्हिडिओ व्हायरल title=

मुंबई : सोशल मीडियाच्या जमान्यात अनेक कलाकार प्रत्येक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अॅक्टिव्ह राहण्याचा प्रयत्न करतात. बी टाऊनची मस्तानी अर्थात दीपिका पदुकोणने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टिक टॉकवर धमाकेदार एन्ट्री केली आहे. 

दीपिकाने तिच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी टिक टॉकवर तिचा पहिला व्हिडिओ शेअर केला आहे. दीपिकाच्या चाहत्यांनी तिच्या टिक टॉक डेब्यूनंतर तिला शुभेच्छा देण्यास सुरुवात केली आहे. दीपिकाची टिक टॉकवर एन्ट्री होताच केवळ १२ तासांच्या आत तिला १२ लाख लोकांनी फॉलो केलं आहे. आता तिच्या फॉलोअर्सची संख्या ३० लाखांहून अधिक झाली आहे.

दीपिकाने तिच्या अधिकृत टिक टॉक हँडलवरुन दोन टिक टॉकर्ससह, एक व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओमधून दीपिका ती या प्लॅटफॉर्मचा हिस्सा बनली असल्याचं सांगतेय. हा व्हिडिओ आतापर्यंत ३० लाखांहून अधिकांनी पाहिला आहे. 

@deepikapadukone

Hope I’m not too late to the party!@riyaz.14 @awezdarbar

♬ original sound - deepikapadukone

दीपिकाने आतापर्यंत टिक टॉकवर ११ व्हिडिओ पोस्ट केले आहेत. लक्ष्मी अग्रवालसोबतही दीपिकाने व्हिडिओ शेअर केला आहे.

@deepikapadukone

bohut zyaada masti...dher sara pyaar... @thelaxmiagarwalpihu

♬ original sound - deepikapadukone

@deepikapadukone

Thank you for your constant love and support... @awezdarbar @nagmaa @faby_makeupartist @motivationkimachine @ur_smartmaker @gunjanshouts @mr.mnv

♬ original sound - deepikapadukone

दीपिकाआधी बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्राने टिक टॉकवर एन्ट्री केली होती. दीपिका सध्या तिच्या आगामी 'छपाक' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.