Nimrat Kaur Tweet : विमानप्रवास करताना आपल्याला अनेक अनुभव हे येतच असतात. विमानच नाही कुठलाही आपण प्रवास करत असलो तरी आपल्या कधी कधी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. असाच एक अनुभव बॉलीवूडच्या अभिनेत्रीलाही चुकला नाही.
निम्रत कौर (Nimrat Kaur) ही सध्याची एक आघाडीची अभिनेत्री आहे. अभिनेता इम्रान खानसोबतच (Imran Khan) तिचा द लन्चबॉक्स (The Lunchbox) हा चित्रपट नऊ वर्षांपुर्वी खूपच गाजला होता. आजही या चित्रपटाची जादू कायम आहे. तसेच तिचा अक्षय कुमारसोबत एअरलिफ्ट हाही सिनेमा गाजला होता. पण नुकताच तिने शेअर केलेला एक प्रसंग ऐकून तुम्हालाही चीड आल्याशिवाय राहणार नाही.
निम्रत कौरनं नुकतंच एक ट्विट शेअर केलंय ज्यात तिनं एका एअरलाईन कंपनीवर निशाणा साधला आहे. या ट्विटमध्ये तिनं या एअरलाईनसोबतचा एक भयानक अनुभव शेअर केला आहे. एक लांबलचक पोस्ट लिहून तिनं या एअरलाईन विरूद्ध आपला राग व्यक्त केला आहे. ही डेल्टा एअरलाईन (Delta Airlines) आहे.
या एअरलाईनमधून प्रवास करताना निम्रत कौरची लेगेज बँग तुटलेल्या अवस्थेत तिला मिळाली. यावर तिनं ट्विट करत डेल्टा एअरलाईन विरूद्ध तक्रार केली. या तुटलेल्या बँगचे फोटोही तिनं ट्विट केले आहेत. इतका हलगर्जीपणा पाहून निम्रत पुष्कळ भडकली आणि याविरूद्ध तिनं आवाज उठवला.
असं काय घडलंय निम्रतसोबत हे तुम्ही जाणून घ्यायलाच हवं कारण असा प्रकार कदाचित तुमच्यासोबतही घडू शकतो. तिनं आपल्या ट्विटमध्ये लिहिलं आहे की,
@Delta I’ve been informed your operations in India are no longer functional. Taking up this matter here to draw your attention to this horrifying ordeal and help me sort this highly stressful situation. pic.twitter.com/DZjibFdtty
— Nimrat Kaur (@NimratOfficial) August 26, 2022
हिच्या ट्विटला एअरलाईनच्या ट्विटर अकांऊटवरून लगेचच प्रतिसाद दिला.
Thank you for your patience. Our Baggage office is currently closed. They are open between the hours of 6 AM - 11:30 PM ET, 7 days a week. I will be transferring our full conversation to a Baggage representative who will be happy to assist you within their operating hours.
— Delta (@Delta) August 26, 2022