बाळ हातात असतानाच अभिनेत्रीचा पाय घसरला आणि... ; Video Viral

तिचा तोल गेला आणि... तिच्या काळजाचा ठोका चुकला.. 

Updated: Jan 25, 2022, 10:58 AM IST
बाळ हातात असतानाच अभिनेत्रीचा पाय घसरला आणि... ; Video Viral
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : रुपेरी पडद्यावर गाजणारे सेलिब्रिटी जेव्हा त्यांच्या कुटुंबाची काळजी घेताना दिसतात तेव्हा चाहत्यांचं कुतुहल आणखी वाढतं. हे कसे आयुष्य जगत असतील, यांचं घर कसं असेल, घरात कोणकोण असेल इथपासूनचे असंख्य प्रश्न चाहत्यांच्या मनात घर करत असतील. 

सोशल मीडियाच्या माध्यमातून अशाच काही प्रश्नांची उत्तरं गेल्या काही वर्षांपासून नकळतच चाहत्यांना मिळू लागली आहेत. 

खुद्द सेलिब्रिटी मंडळीच सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांच्या या प्रश्नांची नकळत उत्तरं देताना दिसत आहेत. 

अशातच एका लोकप्रिय अभिनेत्रीनं नुकताच एक व्हिडीओ पोस्ट केला. या व्हिडीओमध्ये मुलगी लहान असतानाचे दिवस तिनं आठवले. 

2019 मधील एक सीसीटीव्ही फुटेज तिनं शेअर केलं. जिथे लेक मांडीवर झोपल्यानंतर तिला पाळण्यात ठेवण्यासाठी म्हणून ही अभिनेत्री गेली असता तिच्या काळजाचा ठोका चुकला.. 

झोपलेल्या चिमुकलीला हातातून पाळण्यात ठेवण्यासाठी म्हणून ती वाकली आणि तिचे पाय सरकले. लेकिला तिनं अलगद ठेवलं पण, पाय घसरल्यामुळं तिचा पाळण्यावरच तोल गेला. 

मुलीची झोपही मोडली नाही, कारण अभिनेत्रीनं स्वत:ला सावरलं होतं. खाली डोकं वर पाय, अशा अवस्थेत मग ती दिसून आली. ही अभिनेत्री आहे सोहा अली खान. 

अनावधानाने सोहाचा तोल गेला, पण फार मोठी इजा मात्र झाली नाही हे सुदैव. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Soha (@sakpataudi)

बाळ लहान असताना प्रत्येक आईला अशा कित्येक प्रसंगांना सामोरं जावं लागतं जिथे तिच्या काळजाचा ठोका चुकतो. 

पण, बाळाला काहीही न होऊ देण्यासाठी आपल्यावर संकट ओढून घेण्यासाठीही ही आई अगदी सहजपणे तयार असते हेच या व्हिडीओतून दिसत आहे.