मुंबईः जगभरात आज मदर्स डे साजरा होत आहे. प्रत्येक जण आईबद्दलच्या भावना व्यक्त करत आहे. बॉलिवूडही याबाबत मागे नाही. अनेक सेलिब्रिटीजही आईसोबतचे फोटो ट्विट करून मदर्स डे च्या शुभेच्छा दिल्या आहेत.
अभिनेत्री कॅटरिना कैफने आई आणि सासूसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
धक धक गर्ल माधुरी दीक्षितनंही आई आणि बहिणींसोबतचा फोटो शेअर केला आहे. मी जे काही आहे ते तुझं प्रतिबिंब आहे असं म्हणत माधुरीने मदर्स डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
अभिनेत्री जान्हवी कपूरने मदर्स डेनिमित्त भावना व्यक्त केल्या. तू आज जगात नसली तरी तुझं प्रेम प्रत्येक दिवशी अनुभवत असते, तूच या जगातील बेस्ट आई आहेस असं जान्हवीने म्हटलं आहे.
अभिनेत्री अनुष्का शर्मानेही मुलगी आणि आईचा फोटो शेअर करत मदर्स डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसनेही बालपणीचा फोटो शेअर करत मदर्स डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.