Karisma Kapoor : करिश्मा कपूर (Karisma Kapoor) स्वत:च्या दमदार अभिनयाने लहान वयातच बॉलिवूडमध्ये (Bollywood) एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. करिश्माने वयाच्या अगदी 17व्या वर्षी फिल्मी जगतात (bollywood industry) पाय ठेवला. तिचा पहिला चित्रपट होता प्रेम कैदी. अभिनयाचा वारसा हक्क हा तिला तिच्या घरातूनच मिळाला होता. नव्वदीचे दशक (90s) करिश्माने चांगलेच गाजवले होते. तिने बॉलिवूड इंडस्ट्रीला एक-दोन नव्हे तर अनेक हिट चित्रपट दिले आहेत. करिश्मा कपूरचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच वादाच्या भोवऱ्यात होते. बॉलीवूडच्या प्रत्येक अभिनेत्रीप्रमाणेच करिश्मा देखील प्रसिद्धीच्या झोतात आली तेव्हा तिचे प्रेमप्रकरणाना तोंड फुटले.
करिश्मा आणि अजय देवगणच्या अफेअरची चर्चाही खूप मजेदार आहे. असे म्हटले जाते की दोघांनी एकमेकांना जवळपास 3 वर्षे डेट केले होते. करिश्मापूर्वी अजय रवीना टंडनला डेट करत होता आणि करिश्मा आल्यानंतर त्यांचे ब्रेकअप झाले. असे मानले जाते की जिगर चित्रपटानंतर या दोघांचे अफेअर सुरू झाले पण नंतर या सर्व गोष्टी संपल्या.
करिश्मा कपूर आणि सलमान खान यांचीही नावे एकमेकांशी जोडली जात होती. करिश्माचे अजय देवगणसोबत ब्रेकअप झाल्यानंतर ती आणि सलमान खान एकत्र आणि डेट करत असल्याच्या बातम्या येऊ लागल्या. दोघे 1996 मध्ये 'जीत' चित्रपट एकत्र करत होते तेव्हा या चर्चा सुरू झाल्या होत्या.
असे अनेक चित्रपट आहेत ज्यात तुम्हाला करिश्मा आणि गोविंदा एकत्र दिसणार आहेत आणि त्यांची जोडीही त्यावेळी खूप गाजली होती. एक काळ असा होता जेव्हा दोघांचे खूप चित्रपट चालले होते आणि हाच तो काळ होता जेव्हा दोघे जोडले गेले. त्यांच्या अफेअरच्या अनेक बातम्या येत होत्या. पुढे दोघेही वेगळे झाले आणि मग ही गोष्ट इथेच संपली.
अभिषेक आणि करिश्माच्या अफेअरच्या अनेक चर्चा रंगल्या होत्या जेव्हा अभिषेकच्या बहिणीचे लग्न करिश्मा कपूरचा भाऊ निखिलशी झाले होते. अभिषेक आणि करिश्मा कपूर 5 वर्षे एकत्र राहिले आणि लग्नापर्यंत ही चर्चा रंगली होती पण काही कारणास्तव हे नाते होऊ शकले नाही आणि ब्रेकअप झाले.